Santosh Bangar News esakal
मराठवाडा

Hingoli : पाच हजार आदिवासींना मिळणार घरे; आ. संतोष बांगर

शासनाने शबरी आवास योजनेच्या माध्यमातून आदिवासींना घरकुले देण्याचे प्रयत्न चालवले.

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : जिल्ह्यात आमदार संतोष बांगर यांच्या पाठपुराव्यानंतर आदिवासी विकास विभागाच्या वतीने चालू आर्थिक वर्षात पाच हजार घरकुले मंजूर करण्यात आली. त्यामुळे आदिवासी कुटुंबीयांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

हिंगोली जिल्ह्यातील बहुतांश गावे आदिवासी बहुल आहेत. विशेषतः कळमनुरी तालुक्यामध्ये या गावांची संख्या अधिक आहे. शेती व मजुरी हेच आदिवासींचे उदरनिर्वाहाचे साधन आहे. त्यामुळे त्यांना हक्काचे पक्के घर बांधणे शक्य नव्हते. शासनाने शबरी आवास योजनेच्या माध्यमातून आदिवासींना घरकुले देण्याचे प्रयत्न चालवले. मात्र, जिल्ह्यातील आदिवासींची संख्या लक्षात घेता शासनाकडून दिल्या जाणारे उद्दिष्ट अपुरे होते. त्यामुळे आदिवासींना घरकुल मिळण्यासाठी मोठी प्रतीक्षा करावी लागणार होती. त्यातच शासनाने मागील आर्थिक वर्षात हिंगोली जिल्ह्यासाठी केवळ

सहाशे तीन घरकुलांना मंजुरी दिली होती. जिल्ह्यातील आदिवासी बांधवांचे संख्या लक्षात घेऊन आमदार बांगर यांनी शासनाकडे पाठपुरावा करून वाढीव नऊ हजार घरकुले मंजूर करून घेतली. सदर घरकुलांसाठी पात्र लाभार्थींची यादीही तयार करण्यात आली. घरकुलाचे बांधकामही सुरू आहे. दरम्यान, चालू आर्थिक वर्षात जास्तीत जास्त घरे मिळावी यासाठी आमदार बांगर यांनी शासनाकडे पाठपुरावा केला.

त्यानंतर शासनाने पाच हजार घरकुलांना मंजुरी दिली आहे. त्यामुळे आदिवासींचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण होणार आहे. आदिवासींनी आवश्यक त्या कागदपत्रांसह कळमनुरी आदिवासी प्रकल्प कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन आमदार बांगर यांनी केले आहे.

हिंगोली जिल्हा राज्यात पहिला

हिंगोली जिल्ह्यातील मागील वर्षी शासनाने अतिरिक्त नऊ घरकुले मंजूर केली तर यावर्षी पाच हजार घरकुल मंजूर केली आहेत. राज्यात सर्वांत जास्त घरकुल हिंगोली जिल्ह्यात मंजूर झाले आहेत. राज्यात हिंगोली जिल्हा अव्वल ठरला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं सलग तिसऱ्या दिवशी स्वस्त! चांदीच्या भावतही घसरण; आजचा ताजा भाव पाहा

Satara Rain: साताऱ्यात पावसाची दमदार हजेरी! महाबळेश्वरमध्ये १६८ मि.मी. मुसळधार; पश्चिम भाग ओलाचिंब, पूर्वेकडील तालुक्यांत प्रतीक्षा

Latest Marathi News Live Update : घोरावडी रेल्वे स्थानकाजवळ पाण्यात अडकलेल्या बसमधील ३७ प्रवाशांची एनडीआरएफकडून सुखरूप सुटका

बॉलीवूडची पुन्हा एकदा 'कॉपी पेस्ट'? आलिया-शर्वरीचा 'अल्फा' रिलीज होताच ट्रोलर्सच्या निशाण्यावर; नेटकरी म्हणाले...

Pandharpur News : पंढरपुरात धार्मिक स्थळावर दगडफेक, शहरात तणावाचे वातावरण; पोलिसांनी एका संशयिताला घेतले ताब्यात

SCROLL FOR NEXT