file photo 
मराठवाडा

Video : विलासराव देशमुख : तो राजहंस एक

जगदीश जोगदंड

पूर्णा (जि. परभणी) : महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरील लोभस नेतृत्व स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त आज महाराष्ट्रातील जनतेने अभिवादन करताना आपल्या भावनांना आदरांजली अर्पण करत वाट करून दिली. विविध विशेषने वापरून सोशल मीडियातून आदरांजली वाहिली. परंतु, बाप अन् लेकाच्या नात्याचा मुलायम व हळूवार धागा असलेला रितेश देशमुख यांचा निशब्द व्हिडिओ आज मोठ्या प्रमाणात सोशल मीडियात व्हायरल झाला. तो व्हिडिओ मात्र राज्यातील जनतेला रडवून गेला.

बाप - लेकाचे असलेले अतूट व रेशमी नाते रितेशच्या त्या हळूवार पोस्टमधून साकारल्या गेले. वडीलाचे पांढरेशुभ्र कपडे व त्या वरील जॅकेट यांना हळूवारपणे कुरवाळत बिलगणारा भाऊक रितेश डोळ्यात पाणी आणून गेला. अगदी लहानपणी वडिलांना बिलगत असेल तसा तो वडिलांच्या आठवणीने व्याकूळ होत बिलगत होता. त्याचे डोळ्यातील भाव व्हिडिओ पहाणाऱ्याच्या थेट काळजाला भिडत व चिरत जात होते. अन् आपसूकच डोळ्याच्या कडा पाणावत होत्या. तसे पाहता रितेश पट्टीचा अभिनेता पण, या व्हिडिओत त्याचा अभिनय नाही तर वडिलाविषयीच्या भावना, आदर, श्रद्धा व आंतरिक ओढ ओसंडून वाहत होती. एकूणच नैसर्गिक असलेला हा व्हिडिओ म्हणूनच काळजाचा ठाव घेणारा ठरला. 

आई - वडिलांच्या छत्राशिवाय माणूस अपूर्ण 
हृदयातील भावभावनांना रितेश देशमुख यांनी वाट करून दिली, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. तसे पाहता मुलाचा ओढा आईकडेच अधिक असतो. त्यातही राज्याच्या राजकारणात पूर्णवेळ झोकून देणारे विलासराव मुलांसाठी किती वेळ देत असतील, असा प्रश्न प्रत्येकालाच पडला असेल. पण, काही महिन्यांपूर्वी नांदेड येथे अशोकराव चव्हाण यांच्या प्रकट मुलाखती दरम्यान, रितेशने स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या विषयीच्या मुलगा म्हणून असणाऱ्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्या वेळीही त्याचे आसवानी डबडबलेले डोळे सर्वांनी पाहिले होते. वडिलांच्या विषयीचे आकर्षण, नात्यातील मायेचा ओलावा व नात्याचे घट्ट रेशीमबंध त्या वेळी सर्वांनी अनुभवले. माणूस कितीही मोठा झाला तरी आई - वडिलांच्या छत्राशिवाय तो किती अपूर्ण असतो, याची प्रचिती त्या वेळी आली व पुनःश्च एकदा या व्हिडिओतून अधोरेखित झाली. यावरून विलासराव किती कुटुंबवत्सल होते हे स्पष्ट होते. मंगळवारी (ता. २६ ) या व्हिडिओने राज्यातील सर्व विक्रम मोडीत काढत सोशल मीडियात स्थान मिळविले. राज्यातील लहान - थोरांनी त्या व्हिडिओची दखल घेत त्याला स्थान दिले. प्रत्येकाच्या काळजाचा ठाव घेणारा व काळीज पिळवटून टाकणारा हा व्हिडियो म्हणूनच प्रत्येकाला भावला.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLC Election: महायुतीत जागावाटपावरून तणाव! ‘नो कॉम्प्रोमाइज’ मोडमध्ये शिंदेसेना; ७ जागांसाठी आक्रमक भूमिका घेत भाजपवर दबाव

SRH vs RCB Live: विराट कोहलीच्या नावावर वर्ल्ड रेकॉर्ड! गतविजेत्यांनी मोठा डाव टाकला अन् किंग कोहली जगात 'सुपर डुपर' ठरला

NEET Paper Leak प्रकरणात मोठा खुलासा! भौतिकशास्त्राचा पेपर लीक करणारी मुख्य सूत्रधार मनिषा हवालदार; कसा आखला डाव?

Hasan Mushrif Sharad Pawar : हसन मुश्रीफांनी संपलेला विषय पुन्हा काढला, "शरद पवारांना आमदार प्रेमापोटी भेटले असतील"; संजय शिरसाठांवरही केलं भाष्य

Mumbai Health Alert: साखर कमी खाल्ली तरी मधुमेह का होतो? मुंबईतील वाढत्या केसेसमागचं विज्ञान आणि जीवनशैलीतील धक्कादायक कारणं

SCROLL FOR NEXT