rly
rly 
मराठवाडा

नांदेडच्या रेल्वे पोलिसात अवतरला हिटलर !

नवनाथ येवले

नांदेड :  दृष्टीहीन,दिव्यांगास रेल्वेमध्ये सोडायला गेलेल्या दिव्यांग संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याने दिव्यांगासाठीच्या आरक्षीत डब्यामध्ये सामान्य रेल्वे प्रवाश्यांचा शिरकाव होत असल्याचा जाब विचारणाऱ्या दिव्यांग संघटनेच्या एका पदधिकाऱ्यास काठीने जबर मारहान करत सोबतच्या दृष्टीहीन दिव्यांगास नांदेडच्या रेल्वे पोलिसांनी धक्काबुक्कीचा दिव्यांग संघटनांकडून निषेध करण्यात येत आहे. दिव्यांगाना मारहानी प्रकरणी रेल्वे पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक अमित उपाध्याय यांना भेटून चौकशीची मागणी केली. घडला प्रकार हा निंदनिय असल्याचे सांगत पोलिस निरिक्षक अमित उपाध्याय यांनी आंदोलनकर्त्यांची दिलगीरी व्यक्त केली. 

दिव्यांगाना मारहाण प्रकरणाचा निषेध करत जिल्ह्यातील विविध दिव्यांग संघटनांनी नांदेड रेल्वेचे महाव्यवस्थापक गजानन माल्या यांना दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. रेल्वे स्थानकावर नांदेड- पनवेल रेल्वेने पुणे येथे जाणाऱ्या विवेक घुगे या दृष्टीहीन दिव्यांगास सोडण्यासाठी दिव्यांग कृती समितीचे अध्यक्ष राहूल साळवे प्लॅटफार्म क्रमांक चारवर गेले. दिव्यांगासाठी आरक्षीत डब्यातील आसन सामान्य नागरीकांनी काबीज केल्याचे पाहून राहूल साळवे यांनी जवळ असलेल्या रेल्वे पोलिसांना याचा जाब विचारला. मात्र, दिव्यांग रेल्वे प्रवासी लेखी तक्रार करत नसल्याचे सांगत रेल्वे पोलीस जे.पी. कांबळे, श्री. गायकवाड यांनी राहूल साळवे यांना तक्रार द्या म्हणत आरोपील फरपटावे तसे फरपटत रेल्वे पोलिस ठाण्यात घेवून गेले. यावेळी त्यांच्या सोबत  दृष्टीहीन नागनाथ कामजळगे, संजय धुळधानी, कार्तीक भरतिपुरम, गजानन कावळे, राजकुमार देवकर आदी दिव्यांग होते

दारुमिस्त्रीत पाणी पाजण्याचा प्रयत्न 
तक्रार देण्यासाठी रेल्वे पोलिस ठाण्यात घेवून गेल्या नंतर अन्य तीन हिंदी भाषिक पोलिस कर्मचारी त्या ठिकाणी आले. तक्रारकर्त्यास खुर्चीवर बसून तक्रार देण्याचे सांगीतले. या प्रसंगी एका कर्मचाऱ्याने दारु मिस्त्रित पाण्याची बॉटल हातात देत पाणी पीन्याचा आग्रह धरला पाण्यातून दारुचा उग्र वास आल्याने राहूल साळवे यांनी बाटली बाहेर फेकली. ठाण्यात उपस्थितीत हिंदी भाषीक पोलिस कर्मचाऱ्यांनी ‘ तु दिव्यांगोका नेता बनताय क्या’ असे म्हणत त्यांच्या सोबतच्या दिव्यांगांना बाहेर ढकलत खोलीचा दरवाजा लावून पाठीवर,हातावर, मांडी , पिंढऱ्यावर जबर मारहान केली. दृष्ठीहीन दिव्यांग नागनाथ कामजळगे यांनी तात्काळ खासदार हेमंत पाटील यांना फोनद्वारे प्रकराची माहिती दिली असता खासदार श्री. पाटील यांनी सबंधीत कर्मचाऱ्यांशी फोनवर बोलन करुन देण्याची सुचना दिली. पोलिस कर्मचाऱ्यांनी बंद दाराआडून फोनवर बोलण्यास नकार दिला. दिव्यांग कृती समितीचे अध्यक्ष राहूल साळवे यांना मारहाणीच्या निषेधार्थ 

दिव्यांगाचे स्वच्छतागृह नवालाच 
रेल्वे स्थानकावर दिव्यांग प्रवाशांच्या वापरासाठी स्वच्छतागृहा समोर कायम वाहतूकीचे साहित्य ठेवलेले असते. रेल्वे प्रशासनाकडे वारंवार या बाबत तक्रारी करुनही दिव्यांगासाठी वापराच्य स्वच्छतागृहाचे दार साहित्याने कोंडलेले असते या वरुन नांदेड रेल्वे प्रशासनचा दिव्यांगाबाबतच तिरस्कार उघड होतो. 

हातावर पोटभरणऱ्यांकडून पैशाची मागणी
जगण्यासाठी धडपडणाऱ्या कित्तेक दिव्यांगाची उपजिवीका रेल्वेतील हातावरच्या व्यवसायावर अवलंबून आहे. नांदेड रेल्वे स्थानकावरुन धावणाऱ्या गाड्यामध्ये शेकडो दिव्यांग खाद्य पदार्थ, स्टेशनरी साहित्य, बेन्टेक्स ज्वेलरी, पुस्तक, पेन आदी साहित्यांच्या व्यवसायावर उपजिवीका भागवतात. अशा दिव्यांग व्यवसायीकांकडून रेल्वेचे कर्मचारी पैशाची मागणी करत असल्याचा आरोपही दिव्यांगाकडून केला जात आहे. 

प्रवासी पास साठी चकरा 

दिव्यांगाना सवलतीच्या दरात प्रवासी पास साठी रेल्वे प्रशासनाचे महाव्यवसथापक कार्यालय रेल्वे स्थानका पासून अंतरावर आहे. दरम्यान हक्काच्या प्रवासी पास साठी दिव्यांगाना वर्षभरापासून रेल्वे प्रशासनाच्यसा व्यवस्थापकीय कार्यालयामध्ये चकरा मराव्या लागतात.    

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update:"राम कृष्ण हरी," म्हणत पंतप्रधानांचे सोलापुरातील भाषण सुरू

Wagholi Crime News : अष्टविनायक महामार्गावर अपघात; तिघांचा उपचारा दरम्यान मध्यरात्री मृत्यु

Aamir Khan: इम्रान खान करणार कमबॅक,भाच्यासाठी अमिर करणार असे काही की...!

Team India squad T20 WC24 : आज हार्दिक पांड्याचा लागणार निकाल; टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची होणार घोषणा, 'ही' 9 नावे निश्चित

Bank Loan: ग्राहकांना बँकाकडून कर्ज मिळणे होणार अवघड; रेटिंग एजन्सीचा दावा, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT