Holi and Dhulwad celebration eco friendly message of natural farming was given  Sakal
मराठवाडा

Holi Festival 2024 : देवळ्यात पर्यायावरणपूरक होळी व धुळवड साजरी; नैसर्गिक शेती करण्याचाही दिला संदेश

होळी व धुळवड नैसर्गिक पध्दतीने व पर्यायावरणपूरक साजरा कलण्यात झाली. यात महिला शेतकरी गटानेही सहभाग घेतला.

प्रशांत बर्दापूरकर

अंबाजोगाई : येथे सोमवारी (ता.२४) होळी व धुळवड नैसर्गिक पध्दतीने व पर्यायावरणपूरक साजरा कलण्यात झाली. यात महिला शेतकरी गटानेही सहभाग घेतला. देवळा श्रमकरी ग्रुपतर्फे मागील आठ वर्षापासून होळी व धुळवडीचा सण हा पारंपरिक पद्धतीने व सामाजिक संदेश देणारा सण साजरा होतो.

गावची स्वच्छता करून, प्लास्टिक गोळा करून ते नष्ट करणे, तंबाखू, गुटक्याचि होळी केली. व्यसनमुक्तीचे फलक हाती घेऊन जनजागृती करण्यात आली. सोमवारी (ता.२५) पाण्याची नासाडी न करता, नैसर्गिक पद्धतीने बनविलेले रंग लावून धुळवडीचा सण साध्या पद्धतीने सामाजिक संदेश देऊन साजरा करण्यात आला. या वर्षी पर्यावरणपूरक माती, शेती, पाणी, पर्यावरण वाचवा असा संदेश देऊन धुळवड साजरी केली.

झाडे लावा, पाणी वाचवा, माती वाचवा हा संदेश देवळा येथील ग्रामीण किसान शेतकरी गट देवळा सारसा व ऑरगॅनिक महिला शेतकरी गट आणि देवळा श्रमकरी ग्रुपच्या वतीने देण्यात आला. पृथ्वी वाचवण्यासाठी सर्वानी मिळून पावले आजच उचलली पाहिजेत,

आरोग्य उत्तम ठेवायचे असेल तर मातीचे आरोग्य जपले पाहिजे, मातीचे आरोग्य जपायचे असेल तर, शेतकरी जिवंत ठेवावा लागेल, त्यासाठी शेतीमध्ये शेती खर्च कमी करून सेंद्रिय आणि जैविक पर्यावरणपूरक, सेंद्रिय शेती निविष्ठाचा वापर करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया, विज्ञानाची धरू कास, निसर्गाचा धरू हात, उपलब्ध संसाधनाचा करू वापर,

केमिकल आणि प्लास्टिकचा वापर टाळूया, एक संकल्प करून प्लास्टिक, तंबाखू, गुटका, सुपारी पुढी, शेतीतील रासायनिक औषध बॉटल व इतर कचऱ्याबरोबर वाईट विचाराचे फलक, यामध्ये क्रोध, मत्सर, नकारात्मकता,

आळस, मी प्लास्टिक वापरणार नाहीं, मी रासायनिक खते व कीटक नाशक, तणनाशक वापरणार नाहीं, मी केमिकल युक्त रंग वापरणार नाही, अशा विचारांची होळी करून, शेतातील माती, कोळसा, फुलांचा, पानाचा रंग व नैसर्गिक रंग लावून, धुळवड साजरी केली.

यावेळी ऑरगॅनिक महिला शेतकरी गट व ग्रामीण किसान शेतकरी गटाचे सदस्य आणि जेष्ठ समाजसेवक भानुदास देवरवाडे, प्रभाकर सगट यांची उपस्थिती होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi NIA Custody : अनमोल बिश्नोईला ११ दिवसांच्या NIA कोठडी!, पटियाला हाऊस कोर्टाचा निर्णय

Pakistan Involvement in Red Fort Blast : अखेर पाकिस्तानचा खोटेपणाचा बुरखा फाटलाच! दिल्ली स्फोटातील सहभागाची नेत्यानेच दिली कबूली

Petrol Pump : पेट्रोल पंप संध्याकाळी सातनंतर बंद करण्याचा निर्णय मागे; पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचा निर्णय

Mundhwa Land Case : मुंढवा जमीन प्रकरणात शीतल तेजवानींचा जबाब नोंदविला

Pravin Darekar : सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाला गती; सहकाराला आधुनिकतेची जोड द्यावी

SCROLL FOR NEXT