walu 
मराठवाडा

सुटीच्या दिवशी वाळू उपशाचा फंडा

जगन्नाथ पुरी

सेनगाव (जि. हिंगोली) : पाच दिवसांचा शासकीय आठवडा झाला. त्यानंतर दोन दिवस सुटीची संधी पाहून अवैध वाळू माफिया वाळूचा उपसा करून वाहतूक करीत आहेत. मात्र, रविवारी (ता. १६) पहाटेच्या सुमारास महसूल व पोलिसाच्या संयुक्त पथकांने मुडी येथे कारवाइ करत वाळूची अवैध वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर पकडले. वाळू माफियांनी वाळू वाहतुकीसाठी सुटीच्या दिवशी वाळू उपसा करण्याचा फंडा वापरणे सुरू केल्याने शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.

तालुक्यातील विविध १९ वाळू घाटांची लिलाव प्रक्रिया झाली नाही. पर्यावरण व भूजल विभागाकडून वाळू घाटातील अतिरिक्त वाळूचा उपसा केल्यास पर्यावरणाला धोका निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तवित लिलाव प्रक्रियेसाठी घाट अपात्र ठरविण्यात आले आहेत. तालुक्यात विविध योजनेची घरकुल, स्वच्छतागृह व खासगी घरांच्या बांधकामाची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. एकीकडे वाळू घाट लिलाव प्रक्रिया रखडल्यामुळे तालुक्यात वाळूटंचाईची स्थिती निर्माण झाली आहे; तर दुसरीकडे बांधकामासाठी वाळूची मागणी वाढली आहे.

चोरट्यांना दोन दिवस मोकळे रान

 या भागातील मोठ्या घरांच्या बांधकामासाठी दोन महिन्यांपासून गुजरातमधील तापी नदीतील वाळूची आयात केली जाऊ लागली आहे. दरम्यान, लीलावासाठी अपात्र ठरवलेल्या वाळू घाटांतून वाळू माफिया वाळू उपसा करत आहेत. रात्री-अपरात्री चोरटी वाहतूक केली जात आहे. पाच दिवसांचा शासकीय आठवडा झाल्यामुळे वाळू चोरट्यांना दोन दिवस मोकळे रान झाले आहे. या संधीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करणारे तीन ट्रॅक्टर पकडले गेली. 

तीन ट्रॅक्टर पकडले

तहसीलदार जीवककुमार कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी रा. ना. खिल्लारे, एस. आर. बोडखे, अव्वल कारकून विनोद अंभोरे, लक्ष्मण गायवाळ, तलाठी बाळू खेलबांडे, रंणजीत राठोड, पोलिस उपनिरीक्षक अभय माखणे यांनी अवैध वाळू वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर पकडले. गोपनीय माहितीच्या आधारे महसूल व पोलिस यांचे पथक तालुक्‍यातील लिंबाळा हुडी येथे रविवारी रात्री एक वाजता पोचले होते. या वेळी दोन ट्रॅक्टर पकडले; मात्र वाहन पळून गेले. 

दंडात्मक कारवाईची प्रक्रिया

त्यानंतर सकाळी सातच्या सुमारास उटी ब्रह्मचारी रोडवर पोलिसांचे वाहन पाहून एका ट्रॅक्टरचालकाने वाहनातील वाळू रोडवर टाकून वाहन पळविण्याच्या प्रयत्नात ट्रालीचा रॉड तुटला. याच वेळी या वाहनाला पकडले. दोन ठिकाणी अवैध वाळूची चोरटी वाहतूक करणारी तीन वाहने पथकाला पकडण्यात यश आले आहे. वाहन जप्त करून स्थानिक गावातील पोलिस पाटलाकडे सोपविण्यात आले असून पकडलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाईची प्रक्रिया महसूल प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे.

वाळू माफियांचे धाबे दणाणले

पाच दिवसांच्या शासकीय आठवड्यानंतर सलग दोन दिवस सुटी असल्यानंतर महसूल विभागाची वाळू माफियांना भीती नसते. मात्र, रविवारी महसूल व पोलिस विभागाच्या संयुक्त पथकाने दोन ठिकाणी अवैध वाळू वाहतूक करणारे तीन वाहने पकडल्यामुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत. यातील तिन्ही वाहनांवर अंदाजे तीन लाख ८७ हजार रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाई होणार असल्याचे सांगण्यात आले.


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT