jln०९mgp०१जालना : शेतकऱ्यांच्या बांधावर खत पुरवठा करण्यास सुरुवात करताना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, कृषी उपसंचालक विजय माईनकर, कृषी विकास अधिकारी भीमराव रणदिवे, सतीश टोपे,एस.व्ही.कराड, शेतकरी गटाचे प्रमुख रवींद्र गोल्डे आदी.  
मराठवाडा

जालन्यातील शेतकऱ्यांना घरपोच खते

महेश गायकवाड

जालना - राज्यावर कोरोना विषाणूचे संकट ओढवलेले आहे. अशा परिस्थितीत खरीप हंगामाच्या तयारीला कोणत्याही अडचणी येऊ नये, तसेच खते व बियाणे खरेदीसाठी गर्दी होऊ नये म्हणून  शेतकऱ्यांच्या बांधावर खते व बियाणे पोहच करण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे.  या निर्णयाची अंमलबजावणी जिल्ह्यात सूरू झाली असून  जिल्हा परिषदेचा कृषी विभाग व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातर्फे खत पुरवठा करण्यास सुरुवात केली आहे.

खरीप हंगाम सुरू होण्यास काही दिवस बाकी राहिले आहे. शेतकऱ्यांनी शेत मशागतीचे कामे अंतिम टप्प्यात आली आहे. मात्र, कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे शेतकऱ्यांची बियाणे व खते खरेदीसाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी कृषी विभागाने कपाशीचे बियाणे विक्री तुर्तास बंद केली आहे. तसेच खते खरेदीसाठी शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी कृषी विभागाने शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत शेतकऱ्यांच्या बांधावर किंवा गावात खताचा व बियाणाचा पुरवठा करण्याचे नियोजन केले आहे. शुक्रवारी (ता.आठ) अंबड तालुक्यातील  पिंपरखेड येथील मत्स्योदरी ॲग्रो प्रोड्युसर कंपनीमार्फत जवळपास दोनशे शेतकऱ्यांना  विविध प्रकारच्या ४८  टन खतांचा पुरवठा करण्यात आला. 

शेतकऱ्यांच्या बांधावर खत पुरवठा करण्यास सुरुवात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, कृषी उपसंचालक विजय माईनकर, कृषी विकास अधिकारी भीमराव रणदिवे, सतीश टोपे, एस.व्ही.कराड, शेतकरी गटाचे प्रमुख रवींद्र गोल्डे आदींच्या उपस्थितीत झाली.

एखाद्या गावातील शेतकऱ्यांनी एकत्रित मिळून मागणी केल्यास त्यांनाही खताचा पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी भीमराव रणदिवे यांनी दिली.  शेतकऱ्यांनी हव्या असलेल्या खतांची मागणी संबंधित तालुक्याचे कृषी अधिकारी, पंचायत समितीचे कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी किंवा कृषी साहाय्यकांमार्फत नोंदवावी, असे  असे आवाहन  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे  यांनी केले आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर शेतकऱ्यांच्या बांधावर कृषी विभाग विविध खतांचा पुरवठा करत आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार खते उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित एका गावातील शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन हव्या असलेल्या खतांची मागणी कळविल्यास थेट गावात खतांचा पुरवठा करण्यात येणार आहे.
- भीमराव रणदिवे,
कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Attack Video: पत्नीवर पिटबुलचा हल्ला, वाचवायला गेलेल्या पतीलाही चावा; दीड मिनिटात २६ वेळा चावले, हातासह पायावर सर्जरीची वेळ

Dagdusheth Ganpati Temple: ‘दगडूशेठ गणपती ट्रस्ट’ला फरासखाना ठाण्याची जागा मिळणार, पुणे पोलिसांकडून गृह विभागाकडे प्रस्ताव सादर

'वचन दिले तू मला' मालिकेतून अभिनेत्याची एक्झिट; मिलिंद गवळींनी शेअर केली खास पोस्ट ,म्हणाले- खूप त्रास

Shravan Calendar 2026: कॅलेंडर कशाला उघडताय? श्रावणातल्या सगळ्या सणांची यादी इथेच वाचा

Latest Marathi News Live Update : २०१८ च्या भागामध्ये कोणताही महत्त्वपूर्ण बदल झालेला नाही - सरन्यायाधीश

SCROLL FOR NEXT