वालसावंगी प्राथमिक आरोग्य केंद्र. 
मराठवाडा

दोन डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांना होम क्वारंटाइन 

विशाल अस्वार

वालसावंगी  (जि.जालना) - भोकरदन तालुक्यातील पारधच्या कोरोनाबाधित रुग्णाची प्राथमिक तपासणी करणाऱ्या येथील दोन डॉक्टरांसह कर्मचारी तसेच त्यांचे कुटुंबीय आदी १६ जणांना खबरदारी म्हणून होम क्वारंटाइन करण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वी पारध येथे कोरोनाचा रुग्ण आढळल्याने मोठी खळबळ परिसरात उडाली होती.

दरम्यान, आढळलेला कोरोना रुग्ण अगोदर तपासणीसाठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आला होता. तेथे कोरोनाची लक्षणे आढळल्याने त्या रुग्णाला जालना येथे पाठविण्यात आले होते. पुढे रुग्णाचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला होता.

त्यामुळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णाच्या तपासणीदरम्यान उपस्थित असलेले दोन वैद्यकीय अधिकारी, दोन आरोग्यसेवक, एक शिपाई, औषधनिर्माण अधिकारी व त्यांचे कुटुंब अशा एकूण १६ जणांना खबरदारीचा उपाय म्हणून होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. 

आरोग्य सेवा विस्कळित 

दरम्यान, दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांसह अन्य कर्मचारी चौदा दिवस होम क्वारंटाइन असल्याने आरोग्य सेवा विस्कळित झाली आहे. केवळ दोन महिला कर्मचारी प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार पाहत आहेत. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. तात्पुरत्या स्वरूपात वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. 

कोरोना रुग्णाशी दुरून संपर्क आल्याने येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील दोन डॉक्टरांसह कर्मचारी व त्यांचे कुटुंब अशा १६ जणांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लवकरच नवीन वैद्यकीय अधिकारी नियुक्त करण्यात येणार आहे. रुग्णांना अत्यावश्‍यक उपचारासाठी धावडा किंवा पिंपळगाव रेणुकाई येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जावे. लवकरच येथील आरोग्य सेवा सुरळीत होईल. 
- डॉ. रघुवीर चंदेल, 
तालुका आरोग्य अधिकारी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Small Savings Schemes: PPF आणि पोस्ट ऑफिस FD गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! पुढील 3 महिन्यांसाठी व्याजदर जाहीर; पाहा नवे दर

Europe Heatwave: युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते वितळले, लोखंडी ट्रॅक वाकले, हजारो नागरिक रुग्णालयात...भयानक व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : पालघरच्या बोईसर तारापूर एमआयडीसीतील केमिकल कारखान्यात भीषण स्फोट; २ किमी परिसर हादरला

कमळीचे रिअर लाईफ वडिल पाहिलेत का? लेक दिसते सेम टू सेम आई सारखी, वडिलांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रम एकत्र पोहचलं कुटुंब

विजयला रोखण्यासाठी स्टालिन यांचा होता 'भाजप'वाला प्लॅन, 'शत्रू'सोबत हातमिळवणीची दिलेली ऑफर; मोठ्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

SCROLL FOR NEXT