file photo 
मराठवाडा

आपत्कालीन परिस्थितीत होमगार्ड घरीच

सकाळ वृत्तसेवा

परभणी : निष्काम सेवा बजावणाऱ्या होमगार्ड या संघटनेचा जवानांची प्रत्येक वेळेस मदत घेतली जाते. परंतु सध्याच्या आणीबाणीच्या परिस्थितीत सर्व होमगार्डचे जवान घरीच बसून असल्याचे दिसत आहे. या विपरीत परिस्थितीत या जवानांना कामावर बोलून परिस्थिती हाताळण्याच्या आदेश द्यावेत, अशी मागणी होऊ लागली आहे.

संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू झाली आहे. ‘कोरोना’ विषाणूंच्या संसर्गापासून वाचण्यासाठी राज्यभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. पोलिसांवर या संचारबंदीच्या काळात कामाचा अतिरिक्त ताण येत आहे. कायदा व सुव्यवस्था सांभाळणे त्याचबरोबर संचारबंदीच्या काळात नागरिकांना घरात पाठवणे तसेच  गरजवंतांना खाद्य साहित्य पुरवठा करण्याचे कामदेखील पोलिसांना करावे लागत आहे. या काळात पोलिसांच्या मदतीला गृहरक्षक दलाचे जवान दिल्यास पोलिसांवरील कामाचा अतिरिक्त ताण कमी होण्यास मदत होईल. परभणी जिल्ह्यात साडेसातशे ते आठशे होमगार्ड आहेत. यापैकी अनेक होमगार्ड सध्या घरी बसून आहेत सरकार मजूर कामगार यांच्या बद्दल सकारात्मक विचार करत असला तरी देशाच्या व देशांतर्गत सुरक्षेच्या कामात महत्त्वाचा रोल बजावणाऱ्या होमगार्ड जवानांना या काळात कामावर बोलून पोलिसांवर आलेला अतिरिक्त ताण कमी करावा, आणि होमगार्ड हाताला या काळात काम द्यावे अशी मागणी होऊ लागली आहे.

हेही वाचा - कोल्हापुरी बंधाऱ्याने १९४ एकरांवरील क्षेत्र सुजलाम् ...


हेही वाचा ....

आखाडा बाळापूर येथे गरजुंना अन्नधान्याचे वाटप
आखाडा बाळापूर (जि.हिंगोली) :
जिल्हा काँग्रेस समिती व संजय बोंढारे पाटील मित्र मंडळाच्या वतीने रविवारी (ता.२९) गरजूंना अन्नधान्याचे वाटप कुसुमताई चव्हाण सभागृहात करण्यात आले. दररोज मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या मजुरांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मजुरांची होणारी अडचण लक्षात घेता जिल्हा काँग्रेस समिती व संजय पाटील बोंढारे मित्रमंडळाने मजुरांच्या भोजनाचा प्रश्न सोडविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्हाध्यक्ष संजय पाटील बोंढारे, सरपंच जिया कुरेशी, पोलिस निरीक्षक विकास थोरात, बाजार समिती सभापती दत्ता बोंढारे, अरुण सूर्यवंशी, अजहर पठाण, शेषराव बोंढारे, पांडुरंग बोंढारे, मोहम्मद गौस, शहबाज कुरेशी यांच्या उपस्थितीत मजुरांना धान्य वाटप करण्यात आले. गावातील सुमारे शंभरपेक्षा अधिक मजुरांना एक महिनाभर पुरेल एवढे धान्य वाटप करण्यात आले.


हेही वाचा - आडळकरांनी घडविले माणुसकीचे दर्शन

हेही वाचा..

बोथी येथे गरजुंना अन्नधान्याचे वाटप
आखाडा बाळापूर (जि.हिंगोली):
कळमनुरी तालुक्‍यातील बोथी येथे खासदार ॲड. राजीव सातव यांनी केलेल्या आवाहनानुसार जिल्हा परिषद सदस्य डॉ. सतिश पाचपुते यांच्या हस्ते सोमवारी (ता.३०) गरजू व्यक्तींना गहु, तांदूळ व साबनाचे वाटप करण्यात आले. या वेळी पंचायत समिती सदस्य दिलीप डुकरे, मारोती डुकरे, नंदकुमार बोथीकर, लक्ष्मण खोकले, परसराम डुकरे, पोलिस पाटील संतोष बोथीकर, तंटामुक्‍तीचे अध्यक्ष विठ्ठलराव डुकरे, नितिन डुकरे, नारायण काळे, राजु बोथीकर, तोलबा डुकरे, दादाराव डुकरे, बबन वागतकर, साहेबराव डुकरे, भीमराव सावळे, गंगाधर डुकरे आदींची उपस्थिती होती.
... 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: शेअर बाजारात घसरण सुरूच! मात्र LPG गॅस टंचाईमुळे हे शेअर्स आजही तेजीत

Summer Skincare Home Remedies: चेहऱ्यावरची चमक हरवलीय? उन्हाळ्यात त्वचा उजळवण्यासाठी करा ‘हे’ 7 सोपे घरगुती उपाय

Rahul Dravid: ‘द वॉल' राहुल द्रविड यांना जीवनगौरव पुरस्कार; बीसीसीआयच्या वार्षिक सोहळ्यात विश्वविजेत्या संघांचाही गौरव होणार

Shivaji University : ठरलं! शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीचा क्लायमॅक्स जवळ; पाहा मुलाखतीसाठी कुणा-कुणाची नावे शॉर्टलिस्ट? 115 अर्ज, पण संधी फक्त 25 जणांना

LPG Price Hike:सिलिंडरच्या दरवाढीमुळे सामान्यांना फटका! घरगुती सिलिंडर ६० तर व्यावसायिक सिलिंडर ११४ रुपयांनी महाग; आर्थिक गणित बिघडलं..

SCROLL FOR NEXT