latur latur
मराठवाडा

शेतकऱ्यांनी 'फळबाग योजने'चा लाभ घ्यावा; कृषी विभागाचे आवाहन

याबरोवरच नाडेप खत उत्पादन युनिट, गांडूळ खत उत्पादन युनिट योजनाही चालू झाली आहे, अशी माहिती त्यांनी दिली

विवेक पोतदार

जळकोट (लातूर): राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सलग फळबाग लागवड, बांधावर फळबाग लागवड योजना सुरू झाली असून पात्र शेतकऱ्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी आकाश पवार, पर्यवेक्षक विशाल इंगळे यांनी केले आहे. याबरोवरच नाडेप खत उत्पादन युनिट, गांडूळ खत उत्पादन युनिट योजनाही चालू झाली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

तालुक्यातील पात्र सर्व शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे पुढील प्रमाणे आहेत. यात ७/१२ उतारा, ८ अ उतारा (एकूण क्षेत्र २ हेक्टर पेक्षा कमी), आधार कार्ड, राष्ट्रीय बँकेचे बँक पासबुक, जॉब कार्ड, ग्रामपंचायत ठराव आवश्यक आहे. सलग फळबाग लागवडीस १ हेक्टर क्षेत्रासाठी खालील प्रमाणे अनुदान मिळेल.

आंबा कलमे (अनुदान 2 लाख 19 हजार 634), चिक्कू कलमे (अनुदान 1लाख 58 हजार 890) पेरू कलमे (अनुदान 2 लाख 22 हजार 665) डाळिंब कलमे (अनुदान 2 लाख 43 हजार 135), लिंबू, संत्रा, मोसंबी (अनुदान 1 लाख 48 हजार 873), सिताफळ कलमे (अनुदान 1 लाख 38 हजार 542), बांधावरील फळबाग लागवडीस एक हेक्टर क्षेत्रावरील एकूण 20 झाडांसाठी खालील प्रमाणे अनुदान मिळेल.

आंबा कलमे (अनुदान 32 हजार 252), नारळ रोपे (अनुदान 21हजार 442), पेरू कलमे ( अनुदान 10 हजार 182), सिताफळ कलमे (अनुदान 6 हजार 888), जांभूळ कलमे (अनुदान 19 हजार 220) तसेच नाडेप खत उत्पादन युनिटसाठी एकूण अनुदान 15 हजार 500 गांडूळ खत उत्पादन युनिट साठी एकूण अनुदान 11हजार 520 वरीलप्रमाणे योजना चालू आहे. सदर योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी आकाश पवार, कृषी पर्यवेक्षक विशाल इंगळे, मंडळ कृषी अधिकारी निलम बोरकर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026: राही सरनोबतचा एक 'निशाणा' चुकला अन् भारताचे पदक गेलं; 'Frame hit' चा फुल ड्रामा, ५५ हजार भरून अपील केले पण...

बाबो! विद्या बालनने सगळ्यांसमोर पती सिद्धार्थला केलं किस, रोमँटिक लिपलॉकचा व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले...

Gold Rate Today: दसऱ्यापूर्वी सोन्याचे भाव कोसळले! एकाच दिवसात तब्बल 25 हजारांनी घसरण; आजचा 10 ग्रॅमचा भाव पाहा

Solapur Edible Oil: खाद्यतेलाच्या दरात मोठी घट; सोलापूर बाजारात सूर्यफूल, सोयाबीन, पाम तेल प्रतिकिलो ५ रुपयांनी स्वस्त

Latest Marathi News Live Update : अंबाला येथे इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांची संख्या ६ वर

SCROLL FOR NEXT