dharashiv viral hotel esakal
मराठवाडा

Hotel Bhaghyashree: हॉटेल भाग्यश्रीवर दगडफेक; मालकाने जाहीर केली सुट्टी, 'तिरंगा'वाल्याने शेअर केला व्हिडीओ

Stone Pelting Incident in Dharashiv: हॉटेल भाग्यश्रीवर दगडफेक झाल्याची घटना रविवारी घडली आहे. रविवारी हॉटेल बंद होतं. त्यानंतर सोमवारी हॉटेल मालकाने याबाबत इन्स्टाग्रामवरुन माहिती दिली.

संतोष कानडे

Hotel Tiranga: धाराशिव जिल्ह्यातील हॉटेल भाग्यश्रीची सध्या राज्यभरात जोरदार चर्चा आहे. २५० रुपयांमध्ये अनलिमिटेड मटण थाळी मिळत असल्याने हॉटेवर गर्दी असते. विशेष म्हणजे क्वालिटी आणि क्वांटिटीच्या बाबतही हॉटेल मागे नाही, असं मालक वारंवार सांगत असतं. महत्त्वाचं म्हणजे दररोज दहा-बारा-वीस अशी बोकडं कापली जातात, त्यामुळे हे हॉटेल आणि हॉटेल मालक प्रसिद्धीच्या झोतात आहे.

नुकतंच हॉटेल मालकाने फॉर्च्युनर गाडी घेतल्याने त्याचीही सोशल मीडियात जोरदार चर्चा झाली. त्यानंतर हॉटेलमध्ये आणखीनच गर्दी वाढली आहे. मात्र हॉटेलमालक नेहमीच सुट्ट्या घेत असल्याने त्याला ट्रोल केलं जातंय. वेगवेगळी कारणं सांगून हॉटेल बंद ठेवल्याने त्याच्या मीम व्हायरल झाल्या आहेत.

हॉटेलवर दगडफेक

हॉटेल भाग्यश्रीवर दगडफेक झाल्याची घटना रविवारी घडली आहे. रविवारी हॉटेल बंद होतं. त्यानंतर सोमवारी हॉटेल मालकाने याबाबत इन्स्टाग्रामवरुन माहिती दिली. व्हिडीओमध्ये मालक सांगतात की, हॉटेल भाग्यश्री.. आज ९ तारीख आहे. काल बंद होतं. आज उघडणार होतो, परंतु रात्री दगडं मारुन नुकसान केलं आहे. बोर्डचं नुकसान केलं आहे. सगळ्यंनी नोंद करावी, धन्यवाद.. हॉटेल भाग्यश्री नाद करतो काय.

दुसऱ्या व्हिडीओमध्ये मालकाने सांगितलं की, कामगाराचे वडील वारले त्यामुळे अंत्यविधीला गेलो होतो, त्यामुळे हॉटेल बंद होतं. परंतु काही जळणारे माणसं, काही विरोधक.. जे जास्त जळतात ते, त्यांनी काल येऊ दगडं मारुन नुकसान केलं. तुमच्या xxमध्ये दम नाही.. बरोबरीत येऊन धंदा करुन दाखवावा.. मी साठ कापतो (बोकडं) तुम्ही सातच कापून दाखवा, चार-पाच माणसं पाठवून खोड्या करणं बंद करा.

हॉटेल तिरंगाच्या मालकाचा फुल सपोर्ट

''हॉटेल व्यवसाय उभं करणं खूप मोठी गोष्ट आहे. धाराशिव जिल्ह्याचं नाव आम्ही मोठं करतोय. भाग्यश्रीच्या मालकाला विनंती आहे की, खचून जाऊ नका. जिल्ह्याचं नाव आपण दोघेजण मोठं करु. भांडायचं तर समोरासमोर जाऊन भांडा, असल्या खोड्या करु नका.'' असं आवाहन हॉटेल तिरंगाच्या मालकाने अज्ञान हल्लेखोरांना केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन माझ्या बाळाचा बाप, महिलेनं दाखवले DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात नवा वाद

Satara News: 'सातारा जिल्हावासीय महादेवी हत्तीणीसाठी रस्त्यावर'; म्हसवडमध्ये जैन धर्मीयांचा मोर्चा, कऱ्हाडमध्ये स्वाक्षरी मोहीम

ED Action: पवार दाम्पत्याचा पाय अजून खोलात, ईडी अ‍ॅक्शन मोडमध्ये; 'या' दिवशी हजर राहण्याचे दिले आदेश

Agriculture News : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘सीसीआय’कडून कापसाला ८,१०० रुपयांचा भाव

Pune News: लाखो लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या तीर्थक्षेत्राच्या पायथ्याला कचऱ्याचा डोंगर, नागरिक आक्रमक

SCROLL FOR NEXT