NND13KJP03.jpg 
मराठवाडा

होट्टल महोत्सवाची शुक्रवारपासून मेजवानी

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : सांस्कृतीक मेजवानी ठरणारा होट्टल सांस्कृतिक व पर्यटन महोत्सव यंदा गुरुवार (ता. १७) ते शनिवार (ता. १९) अशा तीन दिवसात आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे उद्‍घाटन गुरुवारी पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते तर समारोप रविवारी राज्याचे पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली.


मंत्री अशोक चव्हाण, आदित्य ठाकरे यांची उपस्थिती
जिल्ह्याची ओळख जगाच्या नकाशावर पोचविणाऱ्या तीन दिवसीय होट्टल सांस्कृतिक व पर्यटन महोत्सवाचे आयोजन यंदा गुरुवार (ता. १७) ते शनिवार (ता. १९) अशा तीन दिवसीय कालावधीत होणार आहे. या तीन दिवसात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उदघाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते गुरुवारी सायंकाळी पाच वाजता होणार आहे. तर महोत्सवाचा समारोप रविवारी राज्याचे पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांच्या विशेष उपस्थित होणार आहे.


अधिकारी, पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
या दोन्ही कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शांताबाई पवार, खासदार प्रताप पाटील चिखलीकर, हेमंत पाटील, सुधाकर श्रृंगारे, आमदार सतिश चव्हाण, अमर राजूरकर, भीमराव केराम, माधव पाटील जवळगावकर, श्यामसुंदर शिंदे, बालाजी कल्याणकर, विक्रम काळे, राम पाटील रातोळीकर, रावसाहेब अंतापूरकर, डॉ. तुषार राठोड, मोहन हंबर्डे, राजेश पवार, माजी आमदार सुभाष साबणे, विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश दीपक धोळकिया, कुलगुरु डॉ. उद्धव भोसले, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, देगलूर नगराध्यक्ष मोगलाजी शिरसेटवार, देगलूर पंचायत समिती सभापती संजय वल्कले, जिल्हा परिषद सदस्य ॲड. रामराव नाईक, पंचायत समिती सदस्य मुक्ताबाई कांबळे उपस्थित राहणार आहेत. या वेळी उपस्थित राहण्याचे आवाहन अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, होट्टलचे सरपंच शेषराव सुर्यवंशी, लेखाधिकारी तथा सांस्कृतिक समन्वयक निळकंठ पाचंगे, कार्यकारी अभियंता सुधीर नाईक यांनी केले आहे.

असा असेल तीन दिवसीय कार्यक्रम
शुक्रवारी (ता. १७) दुपारी साडेचार ते पाच या वेळात ऐश्वर्य परदेशी व भार्गव देशमुख यांचे गायन व तबला वादन, रात्री सात ते दहा या वेळात सिनेतारका व नृत्यांगना शर्वरी जमेनिस यांच्या संचाचा अमृतगाथा (कथ्थक नृत्य) होणार आहे. शनिवारी (ता. १८) दुपारी बारा ते दोन या वेळात डॉ. प्रभाकर देव, सुरेश जोंधळे, प्रा. चंद्रकांत पोतदार, डॉ. रंजन गर्गे यांचे ‘चालुक्यण स्थापत्य कला’ या विषयावर चर्चासत्र, सायंकाळी सहसा ते सात या वेळात उद्धवबापू आपेगावकर व ऐनोद्दीन वारसी यांच्या संचाचा पखवाज वादन व बासरी वादन जुगलबंदी व सायंकाळी सात ते दहा या वेळात नवी मुंबई येथील नृत्यांगना ऐवर्श्व बडदे व संचाचा लोककला लावणी नृत्याविष्कार होणार आहे. रविवारी (ता. १९) सायंकाळी पाच वाजता समारोप झाल्यानंतर सायंकाळी सात ते आठ या वेळेत गायक संजय जोशी व संचाचे गीत रामायण, सायंकाळी सात ते नऊ या वेळात विजय जोशी यांचे लोकसंगीत व सायंकाळी नऊ ते दहा या वेळात औरंगाबाद येथील निरंजन भाकरे व संचाकडून भारुड सादर होणार आहे.

हेही वाचलेच पाहिजे.....पन्नास हजार कर्जखाते आधारविना

जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांचा पुढाकार
जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या पुढाकाराने होत असलेल्या या सांस्कृतीक व पर्यटन महोत्सवासाठी खासदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार अमर राजूरकर, आमदार राम पाटील रातोळीकर व तत्कालीन आमदार सुभाष साबणे यांचा स्थानिक विकास निधी मिळाला आहे. या महोत्सवामुळे स्थापत्य वास्तुकलेचा अप्रतिम नमुना असलेला होट्टल परिसर पर्यटकांच्या नजरेत आला आहे. सांस्कृतिक कार्यक्रमामुळे स्थानिक कलाकारांना वाव मिळत आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

SCROLL FOR NEXT