nanded photo
nanded photo 
मराठवाडा

कसा बनवतात आपला तिरंगी झेंडा, वाचा...

शिवचरण वावळे

नांदेड ः खादी हे केवळ कापड नसून तो एक राष्ट्रीय विचार आहे. याच विचारातून निर्मिती झालेल्या खादीच्या राष्ट्रध्वजामुळे दिवसेंदिवस खादीला उभारी मिळत आहे. खादीच्या कपड्यापासून निर्मिती झालेला राष्ट्रध्वज देशभरात फडकवला जातो. यासाठी नांदेडचे खादी ग्रामोद्योग मंडळ वर्षभर विविध आकारीतील ‘तिरंगी ध्वजा’च्या निर्मितीमध्ये गुंतलेले असते. यातुन नांदेडच्या खादी समितीला एक कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त होत आहे.

नांदेडच्या खादी ग्रामोद्योग समितीमार्फत जिल्ह्यात विविध ठिकाणी खादी वस्त्रांचे उत्पादन होते. यात खादीच्या कपड्यांपासून ते चटई, जेवताना बसण्यासाठी लागणारे आसन, बंडी (बनियान), टॉवेल, लुंगी, जॉकेट, मफलर अशी विविध कपडे व वस्तुंची निर्मिती होते. या सर्वांतुन वर्षाला जेवढी कमाई होती. तेवढीच कमाई एकट्या राष्‍ट्रध्वजाच्या निर्मितीमधून खादी ग्रामोद्योग समितीला होते.

खादीच्या मदतीला ‘तिरंगा’ आला धावून
महात्मा गांधी जयंती दरम्यान खादीच्या कपड्यांवर दिली जाणारी सवलत, दिवाळी - दसरा आणि ग्रामपंचायतीच्या निवडणूकांपासून ते लोकसभा - विधानसभा निवडणूकी दरम्यान नेते, कार्यकर्ते खादीच्या कपड्यावर प्रेम दाखवतात. त्यामुळे साहजिकच खादी कपड्यांची जास्त विक्री होते. या वर्षभरात खादीला चांगले उत्पन्न मिळते हे खरे असले तरी, या सर्वांच्या विक्रीतुन मिळणाऱ्या उत्पन्नाप्रमाणेच ‘तिरंगी’ ध्वजाच्या विक्रीतून खादीला उत्पन्न मिळते. त्यामुळे नेहमीच खादीच्या मदतीला तिरंगा धावून येत असल्याचे दिसून येते.

खादीला एक कोटी १८ लाखाची कमाई
नांदेडच्या खादी ग्रामोद्योग समितीकडून विविध अशा दहा साईजमध्ये राष्ट्रीय ध्वजाचे उत्पादन होते. यात सर्वात मोठी १४ बाय २१ या साईजचा ध्वज तयार होते. या ध्वजाची किंमत १७ हजार ८२० रुपये इतकी आहे. मागील वर्षी विविध अशा दहा साईजमधील शिल्लक ध्वजांची संख्या २९ हजार ६६५ इतकी होती. त्यामुळे या वर्षी १२ हजार २८३ ध्वजांची निर्मिती करण्यात आली होती. मागील वर्षाचे शिल्लक ध्वज व चालु वर्षात तयार करण्यात आलेल्या ध्वजांची संख्या ४१ हजार ९३८ इतकी होती. यातुन खादीला एक कोटी १८ लाख चार हजार २२० इतकी कमाई झाली आहे.

हेही वाचा- खासदार हेमंत पाटील यांना आदर्श खासदार पुरस्कार


राष्ट्रध्वजामागील गुपित किस्से -
केशरी, हिरवा आणि मध्यभागी पांढऱ्या रंगावर उठुन दिसणारे निळ्या रंगाचे ‘अशोकचक्र’ अशा या तीन रंगाने मिळुन तयार झालेला राष्ट्रीय ध्वज प्रत्येक भारतीयांसाठी आन, बान आणि शान आहे. अशा या राष्ट्रीय ध्वजाच्या निर्मितीसाठी हे तीन रंग नेमके कसे आणि कुठे एकत्र येतात. ध्वजाचे प्रामाणिकरण कसे केले जाते. त्यासाठी नेमके कोणते सूत्र आहे. कपड्याच्या साईज प्रमाणेदोरी कशी असते. नेफा पट्टी कशी वापरली जाते. ध्वज तयार होण्यासाठी किती दिवस लागतात. ते कुणाकडून तपासून घेतले जातात आणि यासाठी राष्ट्रीय ध्वजाला कुठपर्यंतचा प्रवास करावा लागतो. अशा विविध गोष्टी ज्या तुम्ही कधी ऐकल्या नाहीत त्या बद्दल तुम्हाला या लेखात तुमच्यासाठी ‘सकाळ’ ने माहितीचा खजीणाच उपलब्ध करुन दिला आहे.

खादीबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा - अशी होते तिरंगी झेंड्याची निर्मिती

अशी झाली मराठवाडा खादी समितीची स्थापना

खादी समितीचे मुख्य कार्यालय हैदराबाद येथे होते. तर मराठवाड्यातील मध्यवर्ती ठिकाण म्हणून लातूर तालुक्यातील ‘औसा’ येथे खादीचे उपक्रेंद्र सुरु करण्यात आले होते. ६५ वर्षांपूर्वी सिमावाद उफाळुन आल्याने एक मे १९६० साली मराठी भाषिक राज्याची निर्मिती झाली. तेंव्हापासून मराठी माणसाच्या मनात स्वतंत्र मराठवाडा खादी समिती व्हावी, असे वाटत होते. स्वामी रामानंद तीर्थ आणि गोविंदभाई श्रॉफ यांच्या पुढाकारातुन १९६७ मध्ये मराठवाडा खादी समितीची स्थापना झाली.



 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar "मी आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेलो नाही" अजित पवार असं का म्हणाले?

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबईचीही सुरावात खराब; चार फलंदाज तंबूत

Ajit Pawar Sakal Interview : ''मला संधी दिली म्हणता मग ज्यांनी पवार साहेबांना संधी दिली त्यांचं...'' अजित पवारांचा शरद पवारांवर थेट निशाणा

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT