file photo 
मराठवाडा

महायुतीच्या विरोधातील कारवाईत औरंगाबादेतील बंडखोरांना मात्र अभय

सकाळ वृत्तसेवा


औरंगाबाद : महायुतीच्या विरोधातील बंडखोर उमेदवारास भाजपमधून गुरुवारी (ता.11) बडतर्फ करण्यात आले. ही कारवाई मात्र भाजपने हातचे राखूनच केल्याचे बोलले जात आहे. कारण औरंगाबाद शहरात महायुतीच्या उमेदवाराविरोधात बंडखोरी केलेल्यांवर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी कुठलीच कारवाई केलेली नाही. 


महायुतीच्या अधिकृत उमेदवारांविरोधात बंडखोरी करून निवडणूक लढविणाऱ्या चरण वाघमारे, (तुमसर), गीता जैन, (मीरा भाईंदर), बाळासाहेब ओव्हाळ, (पिंपरी चिंचवड), दिलीप देशमुख, (अहमदपूर, लातूर) यांच्यावर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या आदेशानुसार कारवाई करण्यात आली आहे. भाजपचे पालघर जिल्हा सरचिटणीस संतोष जनाठे यांनी भाजपचा राजीनामा दिला आहे. असे असताना औरंगाबाद जिल्ह्यात भाजपकडून बंडखोरी केलेल्यांना अभय देण्यात आल्याची चर्चा आहे. औरंगाबाद पश्‍चिममधून महायुतीचे उमेदवार संजय शिरसाट यांच्या विरोधात बंडखोरी करणारे भाजपचे नगरसेवक राजू शिंदे तसेच कन्नडमध्ये बंड केलेले बबनराव लोणीकर यांचे जावई किशोर पवार यांना मात्र पक्षाने अभय दिले आहे. त्यांच्या विरोधात शिवसेनेने तक्रार देऊनही कुठलीच कारवाई अद्याप करण्यात आलेली नाही. 

...तरी मोडला पक्षादेश 

औरंगाबाद पश्‍चिममधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारे भाजपचे राजू शिंदे यांना वरिष्ठांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी विनंत्या केल्या होत्या; मात्र फोन बंद करून अज्ञातस्थळी होते. शिंदे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. वरिष्ठांचा आदेश झुगारला. पक्षाने कारवाई करताना तुरळक बंडखोरांवरच कारवाई केली आहे. आता औरंगाबादच्या बंडखोरांवर काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BRICS : ‘भारत-मेक्सिको भावंडांसारखे!’ मेक्सिकन अधिकाऱ्यांनी सांगितलं दोन्ही संस्कृतीमधील साम्य

Amazon Investment: Amazon ची भारतात 48 अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याची घोषणा! कंपनीच्या सीईओंची पंतप्रधानांशी चर्चा; रोजगारही वाढणार

'आयुष्यात प्रेम आणि रोमॅन्सची कमी...' घटस्फोटानंतर ईशा देओल पडली एकटी, म्हणाली...'माझे बॉयफ्रेंड्स होते पण...'

Mumbai News: बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी ८४७ झाडांवर कुऱ्हाड, महाट्रान्सकोच्या याचिकेनंतर हायकोर्टाकडून कानउघाडणी

Latest Marathi News Live Update : सायन-पनवेल महामार्गावर वाहतून कोंडी

SCROLL FOR NEXT