औंढा पोलिस मदत 
मराठवाडा

खाकीतील माणूसकी : औंढा पोलिस ठाण्याच्या वतीने ईदनिमित्त गरिबांना धान्य वाटप

पोलिस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम शुक्रवारी सकाळी पोलिस उपअधीक्षक विवेकानंद वाखारे, पोलिस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांच्या उपस्थितीत झाला.

राजेश दार्वेकर

हिंगोली : औंढा नागनाथ येथील पोलिस ठाण्याच्या (Aundha police) वतीने ईदनिमित्त शुक्रवारी (ता. १४ ) गरजुना तसेच कोरोनाने कुटुंबप्रमुखांचा मृत्यू झालेल्या कुटूंबियांना २५ धान्याच्या (foods suplay poor man) किटचे वाटप करण्यात आले. (Humanity in Khaki: Aundha Police Station distributes food grains to the poor on this occasion)

पोलिस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम शुक्रवारी सकाळी पोलिस उपअधीक्षक विवेकानंद वाखारे, पोलिस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांच्या उपस्थितीत झाला.

हेही वाचा - भोपाळ हे भारतातील सर्वात जास्त दराने डिझेलची विक्री होणारे शहर ठरले आहे.

दरम्यान कोरोनाने लाँकडाऊन असल्याने अनेक गोरगरीब नागरिकांची परवड होत होती. त्यामुळे राकेश कलासागर यांच्या संकल्पनेतून औंढा पोलिस ठाण्याच्या वतीने हद्दीतील गोरगरीब नागरिक, कोरोनाने मृत्यू झालेल्या कुटुंबाची यादी तयार करुन २५ धान्याच्या किट तयार करण्यात आल्या. यामध्ये पाच किलो गहू, दोन किलो तांदूळ, एक किलो तेल, एक किलो साखर, पत्तीपुडा, हळद, मीठपुडा आदी अत्यावश्यक साहित्याची किट तयार करण्यात आली होती. त्याचे वाटप करण्यात आले.

लाभार्थ्यांत सेमीबी सय्यद, आशा केंद्रे, गणेश शितळे, बंशी राठोड, नारायण कांबळे, कोंडबा रणखांबे, गयाबाई मंडलिक, अर्जुन सूर्यवंशी यांच्यासह २५ जणांना ह्या किट वाटप करण्यात आल्या. यावेळी विवेकानंद वाखारे, पोलिस निरीक्षक वैजनाथ मुंडे, ए. जी. लांडगे, गणेश नरोटे, निवृत्ती बडे, राजकुमार सुर्वे यांच्यासह प्रतिष्ठित व्यापारी श्रीराम राठी, लल्ला झांजरी, डॉ सुरेश गंगावणे, प्रमोद अग्रवाल, लल्ला देव, हवालदार अतुल बोरकर, गजानन गडदे, धनवे, पंजाब थिट्टे आदींची उपस्थिती होती.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ३१ जानेवारीपूर्वी घ्या, सुप्रीम कोर्टाचे निवडणूक आयोगाला आदेश

Latest Marathi News Updates : सुप्रीम कोर्टात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर सुनावणी सुरू

Smriti Mandhana: शाब्बास पोरी! स्मृती मानधनाचा जगभरात दबदबा, वन डे वर्ल्ड कपपूर्वी ICC ने दिली आनंदाची बातमी

Gemini Retro Saree Trend होतोय खूप व्हायरल; पण फोटो बनवताना अजिबात करू नका 'या' 5 चुका, नाहीतर इमेज खराब होणारच

Hidden Story: समुद्राखाली दडलेलं सोनं-चांदीपेक्षा मौल्यवान काय आहे? भारत उलगडणार रहस्य, चावी मिळाली

SCROLL FOR NEXT