Hundred crore for Latur Medical College Chief Ministers announcement
Hundred crore for Latur Medical College Chief Ministers announcement 
मराठवाडा

लातूरच्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी शंभर कोटी; मुख्यमंत्र्यांची घोषणा

हरी तुगावकर

लातूर - येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विस्तारीकरणासाठी
तीन टप्प्यात शंभर कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी येथे केली. तसेच येथील जिल्हा शासकीय
रुग्णालयासाठी एक महिन्याच्या आतमध्ये जागा उपलब्ध करून दिली जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

राज्य शासनाच्या वतीने येथे आयोजित अटल महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन रविवारी (ता. 7) श्री. फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी वैद्यकीय शिक्षण व जलसंपदामंत्री गिरीष महाजन,
ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, खासदार
डॉ. सुनील गायकवाड, मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार, डॉ.
अशोक कुकडे, माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील आदींची उपस्थिती होती.

राज्यातील एकही व्यक्ती उपचाराअभावी मरू देणार नाही असा संकल्प आम्ही सोडला आहे. त्यातून हे अटल महाआरोग्य शिबिरे घेतली जात आहेत. हा केवळ दिखावा नाही. तर यातून गरजूंवर पुणे, मुंबई सारख्या ठिकाणच्या मोठ्या रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत शस्त्रक्रीयाही केल्या जाणार आहेत.

आयुष्यमान भारत, महात्मा फुले जनआरोग्य योजना व मुख्यमंत्री सहाय्यता निधी या तीन योजनाचा राज्यातील गरजू रुग्णांना मोठा फायदा होत आहे. केंद्राच्या योजनेमुळे तर पाच लाखापर्यंतचे उपचार मोफत केले जात आहेत.

राज्यात लवकरच दीड लाख वेलनेस सेंटर सुरु करण्यात येणार असल्याचे ते
म्हणाले. लातूरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयासाठी एक महिन्याच्या आता जागा उपलब्ध करून दिली जाईल. येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विस्तारीकरणासाठी तीन टप्प्यात शंभर कोटी रुपयांचा निधी दिला जाईल, अशी घोषणा श्री. फडणवीस यांनी केली.

सध्या मराठवाड्यावर टंचाईचे सावट आहे. पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. ता. 31 डिसेंबरपर्यंत टंचाईची सर्व माहिती हाती येईल. त्यानंतर केंद्र
शासनाचे पथक बोलावून पाहणी करेल. त्यानंतर दुष्काळ जाहिर करण्यात येईल. टंचाईवर मात करण्यासाठी सरकार तुमच्या पाठीशी आहे, असे श्री. फडणवीस म्हणाले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT