Bandhara 
मराठवाडा

शेकडो हेक्टर शेती सिंचनाखाली

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : जिल्‍ह्यातून वाहणाऱ्या कयाधू नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्यात मोठा पाणीसाठा उपलब्ध झाला असून यामुळे सिंचन क्षेत्र वाढण्यास मदत होणार आहे. बंधाऱ्यातील पाण्यामुळे परिसरातील विहीरी व बोअरवेलच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.

जिल्ह्यातून वाहणाऱ्या कयाधू नदीवर हिंगोली ते सेनगाव दरम्यान ठिकठिकाणी कोल्हापूरी बंधारे उभारण्यात आले आहेत. या वर्षी झालेल्या परतीच्या पावसाने कयाधू नदीला पुर आला. या पुरामुळे बंधाऱ्यात देखील मोठ्या प्रमाणावर पाणी जमा झाले आहे. नदीच्या दोन्ही बाजुने शेती असलेल्या शेतकऱ्याच्या विहीरी व बोअरवेलची पाणी पातळीही वाढण्यास मदत झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी नदीपात्रातून जलवाहिण्या टाकून शेतपर्यंत पाणी नेले आहे. त्‍यामुळे शेतकऱ्यांना रब्‍बीच्या पिकांसाठी चांगला लाभ होत आहे.

घोटा बंधाऱ्यात १४४ दलघमी साठा


 तालुक्यातील घोटा येथे कोल्हापुरी बंधारा उभारण्यात आला आहे. या बंधाऱ्यावर तीन ते चार फुटांचे गेट टाकण्यात आले आहेत. त्यामुळे कयाधू नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर जलसाठा तयार झाला आहे. या बंधाऱ्यात १४४ दलघमी पाणीसाठ्याचे नियोजन करण्यात आले असून त्‍याचा ५१ हेक्‍टर क्षेत्राला लाभ होणार आहे.
तसेच तालुक्‍यातील नरसी नामदेव येथून वाहनाऱ्या कयाधू नदीवरील कोल्‍हापूरी बंधाऱ्यावर गेट बसविल्याने लाखो लिटर पाणी नदीपात्रात जमा झाले आहे. या बंधाऱ्यावर गेट बसविण्यात आले नव्हते. त्यामुळे या बंधाऱ्याचा शेतकऱ्यांना काहीच उपयोग होत नव्हता. सर्व पाणी वाहून जात होते. 

बंधाऱ्यात बारा गेट बसविले


दोन वर्षापूर्वी या बंधाऱ्यावर बारा गेट बसविण्यात आले आहेत. यामुळे नरसी नामदेव मंदिर परिसराजवळ मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. परिसरातील विहीरी व विंधन विहीरीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.
बंधाऱ्यात पाणी जमा झाल्याने शेतकऱ्यांनी सिंचनाची पिके घेण्यास सुरवात केली आहे. तीन ते चार वर्षांपासून शेतकऱ्यांना सिंचनाची पिके घेता आली नव्हती. त्यामुळे आता शेतकऱ्यांतून समधान व्यक्त केले जात आहे.


बंधाऱ्याचे लोखंडी दरवाजे गेले चारीला


सेनगाव तालुक्‍यातील विविध नदी व नाल्‍यावर ‘पाणी आडवा पाणी जिरवा’ या उद्दिष्टांसाठी जिल्‍हा परिषद व कृषी विभागाकडून सिमेंट बंधारे बांधण्यात आली. बांधकामानंतर देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याने बहुतांश बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला आहे. तर अनेक बंधाऱ्यावर टाकण्यात आलेले लोखंडी दरवाजे चोरीला गेले आहेत. बंधाऱ्यांना दरवाजे नसल्‍यामुळे पावसाचे हजारो लिटर पाणी वाहून जात आहे. दरम्यान, दरवर्षी जलसंधारणाची कामे केली जातात. या कामांवर कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जात आहे. या योजनांच्या कामांची देखभाल केल्‍यास निश्चितच पाणीटंचाईचा प्रश्न मार्गी लागू शकेल. पावसाळ्यात पडणाऱ्या पाण्याचे योग्‍य नियोजन करणे गरजेचे आहे. बंधाऱ्यांची देखभाल, गाळ उपसा व लोखंडी दरवाजे बसवण्याची मागणी गावकऱ्यांमूधन केली जात आहे.

रब्बीला फायदा
घोटा येथून वाहणाऱ्या कयाधू नदीवरील कोल्‍हापुरी बंधाऱ्यात पाणीसाठा जमा झाला आहे. या पाणीसाठ्यामुळे विहीर, बोअरेवलच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. या पाण्याचा उपयोग रब्‍बीच्या पिकांना होणार आहे.
सब्‍बमीत कांबळे, शेतकरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT