file photo 
मराठवाडा

घरफोडीत सव्वा लाखांचा ऐवज पळविला !

विलास शिंदे

सेलू (जि.परभणी) : सेलू येथील गणेश नगर मधील गणेश संपतराव केंद्रे यांच्या घरी शनिवारी (ता.१८) रोजी मध्यरात्री वाजता सव्वा लाख रुपयांची घरफोडी झाली. या संदर्भात सेलू पोलिस ठाण्यात चोरट्यांविरूध्द गुन्हा नोंद झाला अाहे.

गणेश केंद्रे हे रात्री जेवण करून झोपल्यानंतर शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास सहा चोरट्यांनी घराचे चॅनल गेट व दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. या घरात एकूण चार भाडेकरू राहतात. परंतू, सर्व घरांच्या व आजूबाजूच्या घरांच्या चोरट्यांनी बाहेरून कड्या लावून घेतल्याने तातडीने मदत मिळू शकली नाही. दरम्यान, घरात प्रवेश केल्यानंतर गणेश केंद्रे व त्यांची पत्नी असलेल्या खोलीत चोरट्यांनी प्रवेश केला. चोरट्यांनी गणेश केंद्रे व त्यांच्या पत्नीच्या गळ्याला चाकू लावून शांत बसण्यास सांगितले व कपाटातील रोख वीस हजार रुपये रोख व सोने, चांदी असे विकून एक लाख पंधरा हजार सातशे रुपयांचा ऐवज पळविला. चोरटे पसार झाल्यानंतर शेजाऱ्यांनी दरवाजे उघडले तेव्हा केंद्रे कुटुंब खूपच घाबरलेले होते.

 श्वान पथकाने माग काढला नाही
घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी प्रकाश एकबोटे, पोलिस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर यांनी भेट देऊन पाहणी केली. या वेळी परभणी येथून श्वान पथकदेखील पाचारण करण्यात आले होते. परंतू, श्वान पथकाने जास्त लांब माग काढला नाही. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रवीण मोरे यांनीही घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. या वेळी त्यांनी परिसरात देखील काही जणांच्या घरांना भेटी देऊन माहिती घेतली. गणेश केंद्रे यांच्या फिर्यादीवरून सेलू पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी प्रकाश एकबोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर करीत आहेत. या घटनेमुळे शहरातील नागरिकात भितीचे वातावरण पसरले अाहे.

हेही वाचा- माध्यमांनी तटस्थ भुमीका जपणे गरजेचे : प्रा. डोळे ​

घर मे जा बडा साब है...
चोरीची घटना सुरू असतांना घरातील भाडेकरूंना कल्पना आली होती. परंतू, बाहेरून कडी लावल्याने काहीच करता येत नव्हते. परंतू, दुसऱ्या मजल्यावर राहणारे भाडेकरू श्री. डोईफोडे यांनी दुसऱ्या मजल्यावरून गॅलरीमधून बाहेर पाहिले असता बाहेर दोन चोरटे उभे होते व त्यांनी श्री. डोईफोडे यांना दम देत ‘घर मे जा, तेरा बडा साब है’ असे सांगितले. आता बडा साब कोण आहे? याचा शोध घेण्याचे आवाहन पोलिसांसमोर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Dare Village : गावी आलो किंवा लंडनला गेलो तरी पोटदुखी, “ विरोधकांना कामातून उत्तर देईन”,एकनाथ शिंदेंनी दरेतून साधला निशाणा

रोहित शर्माचा Mumbai Indians मधील 'सहकारी' Ajit Agarkar ची जागा घेणार; आता हिटमॅन २०२७ चा वर्ल्ड कप खेळणारच...

सगळं सोडून द्यायचा विचार होता पण...; सुटकेनंतर संतोष पंडित काय म्हणाले? तुरुंगातल्या व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह

Marathi News Live Updates : UPI व्यवहारांवर शुल्क, व्यापाऱ्यांकडून QR कोड हटवण्याची भूमिका

Panvel News: पनवेलमध्ये वाहतुकीत मोठे बदल! गणरायाच्या विसर्जन मिरवणुकांसाठी प्रशासनाचे कडक पाऊल

SCROLL FOR NEXT