Beed sajak
मराठवाडा

Natya Sammelan : ज्येष्ठ कलावंतांसाठी मुंबईत वास्तू बांधू ; उदय सामंत ,बीडमध्ये नाट्यसंमेलन

ग्रामीण भागातून येणाऱ्या कलावंतांची राहण्याची व्यवस्था व्हावी यासाठी मुंबईजवळ दोन एकर जागा देऊ. ज्येष्ठ कलावंतांसाठी चांगली वास्तू निर्माण करू. नाट्य परिषदेने यासंदर्भात विचार करावा, असे आवाहन नाट्य परिषदेचे विश्‍वस्त तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले. शंभराव्या अखिल भारतीय नाट्य संमेलनानिमित्त येथे शुक्रवारी विभागीय नाट्यसंमेलन उत्साहात झाले. त्यावेळी ते बोलत होते. संमेलनानिमित्त

सकाळ वृत्तसेवा

बीड : ग्रामीण भागातून येणाऱ्या कलावंतांची राहण्याची व्यवस्था व्हावी यासाठी मुंबईजवळ दोन एकर जागा देऊ. ज्येष्ठ कलावंतांसाठी चांगली वास्तू निर्माण करू. नाट्य परिषदेने यासंदर्भात विचार करावा, असे आवाहन नाट्य परिषदेचे विश्‍वस्त तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले. शंभराव्या अखिल भारतीय नाट्य संमेलनानिमित्त येथे शुक्रवारी विभागीय नाट्यसंमेलन उत्साहात झाले. त्यावेळी ते बोलत होते. संमेलनानिमित्त

शहरातून भव्य नाट्यदिंडी काढण्यात आली. अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष, अभिनेते प्रशांत दामले यांच्या हस्ते या दिंडीचे उद्‍घाटन झाले. पारंपारिक वेशभूषेत कलावंत दिंडीत सहभागी झाले. दिंडीतील रथात परिषदेचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी सहभाग घेतला. स्वागताध्यक्ष डॉ. योगेश क्षीरसागर, नाट्य परिषदेच्या बीड शाखाध्यक्षा डॉ. दीपा क्षीरसागर उपस्थित होत्या.

पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्‍घाटन झाले. उद्योगमंत्री सामंत, प्रशांत दामले, आमदार प्रकाश सोळंके, परिषदेचे कार्यवाह अजित भुरे, उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईल, उपाध्यक्ष नरेश गडेकर, अभिनेते सचित पाटील, अभिनेत्री गौरी कुलकर्णी, सहकार्यवाह समीर इंदुलकर, सतीश लोटके, अभिनेत्री सविता मालपेकर आदी उपस्थित होते.

सुरू करावी लागतील मोबाइल व्यसनमुक्ती केंद्रे

आयुष्यात आलेली अनेक नाटकं भोगली, पण पहिल्यांदा मला विभागीय नाट्य संमेलनाचे उद्‌घाटन करण्याची संधी मिळाली. जिल्ह्याने नाट्य क्षेत्राला अनेक नामवंत हिरे दिले, असे गौरवद्गार कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी काढले. घराघरांत मोबाईलच्या माध्यमातून कलाकार तयार झाले आहेत. पण, येत्या पाच वर्षांत मोबाईल व्यसनमुक्त केंद्र सुरू करावे लागतील, अशी काळजीही त्यांनी बोलून दाखवली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway News: प्रदूषणाला रेल्वेचं जोरदार उत्तर! आता पैसा अन् वेळही वाचणार; भारतीय रेल्वेची नवी वाहतूक क्रांती सुरू, योजना काय?

Pune Court Decision: पतीला जीव देण्यास प्रवृत्त केलं, पत्नीला सात वर्षांची सक्तमजुरी! दुसरा विवाह अन्...

Latest Marathi Breaking News Live Update: शिवसेना ठाकरे पक्षाचे एबी फॉर्म चोरीला - अनिल देसाई

Akola News : सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे खाजगीकरण करण्याचा डाव; आ. साजिद खान यांचा स्फोटक आरोप

Leopard Attack : दोन बिबट्यांचा मेंढ्यांच्या कळपावर हल्ला; जीव धोक्यात घालून मेंढपाळ महिलेने केला प्रतिकार

SCROLL FOR NEXT