beed
beed 
मराठवाडा

पतीने केला पत्नीचा गळा दाबून खून

सकाळवृत्तसेवा

माजलगाव (बीड) : शहरा पासून जवळच असलेल्या फुले पिंपळगाव जवळील मॅनकॉट जिनींगमध्ये आज सकाळी  उषा गणेश ढवळे (रा.शेलगाव देशमुख ता.मेहकर जि.बुलढाणा) या महिलेचा पतीने संशयाच्या कारणावरून गळा दाबून खून केल्याची घटना (ता. 9) शनिवारी घडली असून आरोपी  गणेश ढवळे यास पोलिसांनी एका तासात अटक केली आहे. 

शहरातील मनकोट कापूस केंद्रावर उषा व गणेश ढवळे हे पती पत्नी कामगार आहे. मागील काही दिवसांपासून ते कामासाठी माजलगावला आले होते. शहरातीलच मॅनकॉट जिनींगवर काम करून उदरनिर्वाह भागवित होते. गणेशचा पत्नीवर नेहमी संशय असे. तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तो तिला मारहाण करण्याबरोबरच तिचा शारिरीक व मानसिक छळ करीत होता. याच संशयातून दोघांमध्ये वाद झाले. यातच गणेशने उषाचा गळा दाबून खून केला. आज  सकाळी सात वाजता ही घटना उघडकीस आली. 

सदरील घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सय्यद सुलेमान यांनी घटनास्थळी धाव घेतली. पतीवर संशय आल्याने त्यांनी तात्काळ पथके रवाना केली आणि अवघ्या तासात  आरोपी  गणेशला पोलिसांनी अटक केली असून  त्याने गुन्हा कबूल केल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगितले
दरम्यान या घटनेने खळबळ उडाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Fact Check: धर्मांतर करा असे सांगणारा कन्हैय्या कुमार यांचा फेक व्हिडीओ पुन्हा व्हायरल; वाचा काय आहे सत्य

Amitabh Bachchan: बिग बींचं एक ट्वीट अन् नव्या वादाला सुरुवात; भाजप-आदित्य ठाकरेंमध्ये ट्विटर वॉर, नेमकं प्रकरण काय?

Sangli Lok Sabha : सांगलीच्या जागेबाबत शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, याची चर्चा न होता थेट टीव्हीवरच..

Latest Marathi News Live Update : सांगलीत भाजपचे दोन उमेदवार आमच्यासमोर- संजय राऊत

SCROLL FOR NEXT