husband killed wife family dispute crime beed police action suspect arrested  esakal
मराठवाडा

Beed Crime News: सासुरवाडीत पत्नीची हत्या; पतीला जन्मठेप

बीड तालुक्यातील बोरखेड येथील खून प्रकरण

सकाळ वृत्तसेवा

बीड : माहेरी गेलेल्या विवाहितेची सासुरवाडीत जाऊन न विचारता, माहेरी का आलीस? म्हणत चाकूने भोसकून हत्या करणाऱ्या आरोपी पतीला जन्मठेप व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. खुनाची घटना दोन वर्षांपूर्वी बोरखेड (ता. बीड) येथे घडली होती. अपर सत्र न्यायाधीश सुरेखा पाटील सोमवारी (ता. ३०) शिक्षेचा निकाल सुनावला. शहाजी काळे (वय ३२, रा. हंगेवाडी, ता. भूम, जि. उस्मानाबाद) असे आरोपीचे नाव आहे.

शहाजी काळे याची पत्नी नगिणा (वय २५) हिचे माहेर बोरखेड (ता. बीड) आहे. घटनेच्या आधी नऊ वर्षांपूर्वी नगिणाचा विवाह शहाजीशी झाला होता. लग्नानंतर ती सासरी नांदण्यास गेली. मात्र, पती- पत्नीत सतत वाद होत. पतीशी भांडण झाल्याने नगिणा ता. आठ ऑक्टोबर २०२० रोजी माहेरी निघून आली होती.

दोन दिवसांनी म्हणजे ता. १० ऑक्टोबर २०२० रोजी शहाजी काळे हा सासुरवाडीत गेला. तू मला न विचारता माहेरी का आलीस, अशी कुरापत काढून त्याने चाकूने कानावर, छातीवर, पोटात सपासप वार केले. यात ती गंभीररीत्या जखमी झाली. तिला रक्ताच्या थारोळ्यात सोडून शहाजी काळे याने पोबारा केला. माहेरच्या लोकांनी तिला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

नगिणा काळेच्या आईच्या फिर्यादीवरून नेकनूर ठाण्यात पती शहाजी शहात्तर काळाविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद झाला. तत्कालीन सहायक निरीक्षक लक्ष्मण केंद्रे व उपनिरीक्षक किशोर काळे यांनी तपास करुन मुदतीत दोषारोपपत्र दाखल केले. हे प्रकरण अपर सत्र न्यायाधीश सुरेखा पाटील यांच्यासमोर सुनावणीसाठी आले.

सरकार पक्षाने एकूण १४ साक्षीदार तपासले. तपास अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, फिर्यादी, तपास अधिकारी यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. घटनास्थळी आढळलेले पुरावे, न्यायवैद्यक चाचणी अहवाल देखील आरोपीला शिक्षेपर्यंत पोचविण्यास महत्त्वाचा ठरला. सरकारी वकील अनिल धसे यांचा युक्तिवाद, साक्षीपुरावे ग्राह्य धरून न्यायाधीश सुरेखा पाटील यांनी आरोपी शहाजी काळेला दोषी ठरवून दहा हजार दंड व जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. अटकेपासून आरोपी कारागृहात होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Racism in Australia : भारतीयांना मारुन टाका अन् त्यांच्या बायका गुलामगिरीसाठी विका... ऑस्ट्रेलियात वर्णद्वेषाचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

College Student Death : वाढदिवसाच्या 3 दिवस आधीच काळाचा घाला! कोल्हापुरात 18 वर्षांच्या महाविद्यालयीन तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल; घरात कोणी नसताना संपवलं जीवन

Hingoli: हिंगोली जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचा सौम्य धक्का; वसईजवळ ३.५ तीव्रतेची नोंद, जीवित-वित्तहानी टळली..

Latest Marathi News Live Update : शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक; नांदेड ते पूर्णा रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन

...अन् अचानक सेटवर आले रोहित शेट्टी! 'Governor' च्या शूटिंग दरम्यान चिन्मय मांडलेकरसोबत घडला रंजक प्रसंग

SCROLL FOR NEXT