crime 
मराठवाडा

बीड हादरले! पत्नी, मुलीचा गळा चिरुन खून; पतीची आत्महत्या

दिगंबर देशमुख

सिरसाळा (जि.बीड) - सिरसाळा गावातील मोहा रोडवरील एकाने आपल्या पत्नीचा व दोन वर्षाच्या मुलीचा गळा चिरून खून करून नंतर स्वतः फाशी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (ता.२४) रात्री दहाच्या दरम्यान उघडकीस आली. शेख अल्लाबक्षी अहमद (वय 32) , पत्नी शबनम व मुलगी आशपिया (Beed) अशी मृतांचे नावे आहेत. अल्लाबक्षी हा परळी वैजनाथ येथील थर्मल पाॅवर स्टेशन येथे वेल्डर या पदावर काम करत होता. शुक्रवारी परभणी येथे मामेभावाचा विवाह होता. या विवाहानिमित्त (Crime In Beed) दोघे भाऊ नातेवाईक गेले होते. मी पाठीमागून येत आहे, असे त्याने सांगितले होते. घरात कोणीच नव्हते. यानंतर त्याने या विवाहाला आम्ही पाठीमागून येत आहोत असे सांगितले होते.

परंतु दुपारच्या वेळेस घराला बाहेरून कुलूप लावून व घरातील दोन वर्षे मुलगी आशपिया, पत्नी शबनम हिचा गळा चिरून खून केला. नंतर स्वतः फाशी घेऊन आत्महत्या करून आपले जीवन संपवले. या घटनेने खळबळ उडाली आहे. यानंतर रात्री लग्नाचे नातेवाईक मृत मुलीचे वडील सर्व लग्नाला आले नाही. या चिंतेने परेशान होते. घराचा दरवाजा उघडला असता हा प्रकार उघडकीस आला. या घटनेचे नेमके कारण समजू शकले नाही, परंतु घरगुती वादातून घटना घडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला जात आहे. तिघांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात करण्यात आले असून या घटनेने सकाळी मृताच्या त्याच्या घरासमोर लोकांनी गर्दी केली होती. या प्रकरणी तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रदीप एकशिंगे करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT