महिला व बाल विकास विभागा.jpg 
मराठवाडा

‘मला बोलायचे आहे’.....लॉकडाऊनच्या काळात व्हा व्यक्त

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : सध्याच्या काळात आपण सर्वजण एका कठीण प्रसंगातून जात आहोत. कोवीड -१९ या विषाणूमुळे होणाऱ्या आजारामुळे सर्वजण भीतीच्या छायेखाली वावरत आहोत. या आजाराचा मुकाबला करण्यासाठी आपले सरकार व सर्व अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या यंत्रणा, संस्था, व्यक्ती अतिशय धीराने व कर्तव्यभावनेने ही परिस्थिती हाताळत आहेत.

ऑनलाईन मंच ‘मला बोलायचे आहे’
दैनंदिन जीवनात कुटुंबाच्या पातळीवर महिलांना अनेक प्रसंगांना सामोरे जावे लागते. कौटुंबीक हिंसा ही एक अशी समस्या आहे जिचा महिलांच्या शारिरीक व मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. कुटूंबात होणाऱ्या हिंसेमुळे महिलांचे स्वतःचे मनोबल तर खचतेच पण त्याचा परिणाम विशेषतः लहान मुलांवर खूप होतो व पर्यायाने कुटूंबावर ही झालेला आपण बघतो. रोजच्या जगण्यात शारिरीक, मानसीक, लैंगिक, भावनिक, आर्थिक हिंसा सहन करणाऱ्या महिलांकरीता सध्याच्या या लॉकडाऊन च्या परिस्थितीत त्यांचे मन मोकळे करण्याकरीता व स्वतःवर होणाऱ्या हिंसेला स्विकारुन त्याबाबत बोलण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपासाठी एक ऑनलाईन मंच सुरु करीत आहोत - ‘मला बोलायचे आहे’

मनाचा लॉकडाऊन नको
मैत्रिणींनो सध्या बाहेर लॉकडाऊन असला तरी मनाचा लॉकडाऊन नको, तेव्हा जरूर संपर्क साधा  आणि हो...तूमची माहिती संपूर्णपणे गुप्त ठेवले जाईल. खालील क्रमांकावर समुपदेशन आणि संबंधित संदर्भ  सेवांची माहिती ही फक्त लॉक डाऊन कालावधी मध्येच  देण्यात येईल. त्यानंतर या सेवा सुरळीत सुरु होतील. फोनद्वारे बोलण्यासाठीची वेळ सकाळी दहा ते संध्याकाळी सात अशी असेल.

हिंसा सहन करणाऱ्या महिलांची संपर्क करावा  
हिंसा सहन करत असलेल्या फक्त महिलांनीच खालील क्रमांकावर जरूर संपर्क साधावा. ‘मला बोलायचे आहे’ या ऑनलाइन मंचावर -तज्ज्ञ व अनुभवी समन्वयक - ‘समिधा’शी बोलण्यासाठी मोबाइल क्रंमाक 776790922, 8692034587, 9970161988, 870217795, 9833263606, 9284748109 संपर्क करावा. 
अधिक माहितीसाठी व आणीबाणीच्या परिस्थितीत तातडीच्या सेवांसाठी जसेकी तात्पुरत्या निवासाची सोय, वैयक्तिक कायदेशीर मार्गदर्शन, इत्यादींकरिता आपल्या जिल्ह्याच्या महिला व बाल विकास विभागातील संरक्षण अधिकारी व विधी सल्लागार यांच्याशीही फोनद्वारे संपर्क साधू शकता. लक्षात ठेवा कोरोना संक्रमणाच्या या कालावधीत घरीच रहा, स्वतःची काळजी घ्या आणि कोरोनापासून बचावासाठी सर्व नियमांचे पालन करा. 
महिला व बाल विकास आयुक्तालय, महाराष्ट्र शासन पुणे कडून प्रसारित

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

चौथ्या T20I मध्ये भारतीय संघाचा लाजीरवाणा पराभव'या'३ मोठ्या चुकांमुळे मालिका गमावली,गंभीर हतबल, एकटा कर्णधार श्रेयस करणार तरी काय?

Student End Life : गृहपाठ न केल्याने २० रुपयांचा दंड; आठवीतील विद्यार्थिनीने चिठ्ठी लिहून उचललं टोकाचं पाऊल, नोटमध्ये नेमकं काय?

दोन्ही भाऊ इंडस्ट्रीत, चांगलं कमावता, एकत्र कुटुंबात राहता मग घरखर्च कोण करतं? अधोक्षज कऱ्हाडेने सांगितलं आर्थिक गणित

Mumbai News: मुंबईत बेस्ट चालकाचा अजब कारनामा! शेवपुरीसाठी बस थांबवून प्रवाशांचा खोळंबा; जाब विचारणाऱ्यांना चालकाची शिवीगाळ

'तू नग्न अवस्थेत सीन करशील का?' दिग्दर्शकाने सैफ अली खानकडे केलेली विचित्र मागणी, अभिनेता म्हणाला...

SCROLL FOR NEXT