If the agricultural pump customers do not pay for the current year, the power supply will be disrupted
If the agricultural pump customers do not pay for the current year, the power supply will be disrupted 
मराठवाडा

कृषीपंप ग्राहकांनी चालू वर्षाचा वीज भरणा न केल्यास वीज पुरवठा होणार खंडित

राजेश दारव्हेकर

हिंगोली : जिल्ह्यातील ७५ हजार २५९ कृषी पंप ग्राहकाकडे सप्टेंबर २०२० अखेर चालू वर्षाचे ३१३३.५५ लाख वीज देयक आहे. त्यामुळे कृषी पंप ग्राहकांनी विजबिलाचा भरणा न केल्यास वीज पुरवठा खंडित करण्याचा इशारा वीज वितरण कंपनीने दिला आहे.

यामध्ये औंढा तालुक्यात १२ हजार २५८ ग्राहकाकडे ५४७.०६ थकीत रक्कम आहे. तर वसमत तालुक्यात २१ हजार ६८१ ग्राहकाकडे ९६६.५२ लाख रुपयांची थकबाकी आहे. हिंगोली तालुक्यात १२ हजार ४२५ ग्राहकाकडे ४४५.८३ लाख रुपयांची रक्कम थकीत आहे. कळमनुरी तालुक्यात १४ हजार ०५२ ग्राहकाकडे ५१२.१२लाख रुपयांची वीज देयक थकीत आहेत.

सेनगाव तालुक्यात १४ हजार ८४३ कृषी ग्राहकाकडे ६६२.०२ लाख वीज देयक भरणा आहे. त्यासाठी कृषी पंप धारकांनी चालू वर्षाचे वीज देयके भरणा करून महावितरण कंपनीस सहकार्य करण्याचे आवाहन अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव यांनी केले आहे. अन्यथा वीज देयके भरणा न केल्यास तात्पुरत्या स्वरूपात वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे. आता वीज वितरण कंपनी धडक मोहीम तालुका निहाय सुरु केली आहे. त्यामुळे सहकार्य करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kiran Sarnaik: आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील ४ जणांचा अपघातात मृत्यू! पातूरमध्ये भीषण अपघात

Pune Traffic Update: उद्यापासून पुणे वाहतुकीत गर्डर लॉचिंग कामामुळे मोठे बदल, कोणते असतील पर्याय मार्ग?

Kapil Sharma : 'द ग्रेट इंडियन कपिल शो'साठी कपिल शर्मा घेतो 'इतकं' मानधन !

Chitra Wagh: "चित्रा वाघ यांनी माफी मागावी अन्यथा..."; 'पॉर्नस्टार' प्रकरणावर अभिनेत्याचा गंभीर इशारा

RBI: गुंतवणूकदार मालामाल! रिझर्व्ह बँकेचा एक निर्णय अन् कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत

SCROLL FOR NEXT