0MASK 
मराठवाडा

तोंडाला मास्क न लावल्यास आता एक हजार रुपयांचा दंड, उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी काढला आदेश

सयाजी शेळके

उस्मानाबाद : तोंडाला मास्क न लावल्यास आता एक हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी मंगळवारी (ता.२२) याबाबतचे आदेश काढले आहेत. त्यामुळे घरातच मास्क विसरणाऱ्यांची चांगलीच पळापळ होणार आहे. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. या संसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाकडून विविध प्रकारे प्रयत्न केले जात आहेत.

संशयितांची तपासणी करून त्यांचे विलगीकरण केले जात आहे. याशिवाय होम क्वारंटाईन केले जात असून रुग्णसंख्या नियंत्रित ठेवण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहे. तरीही जिल्ह्यातील रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच जिल्ह्यातील रुग्णांच्या मृत्युंचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागही चिंतेत आहे. असे असतानाही काही नागरिक जाणीवपूर्वक तोंडाला मास्क न लावता फिरताना दिसून येत आहेत. वारंवार सूचना देऊनही अशा नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन केले जात आहे.

आम्हाला काहीही होत नाही, या अविर्भावामध्ये काहीजण जाणीवपूर्वक तोंडाला मास्क लावण्याचे टाळत आहेत. त्यामुळे रोगाचा संसर्ग वाढत आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी नियम अधिक कडक करण्याची भूमिका घेतली आहे. यापूर्वी मास्क न लावणाऱ्यांकडून २०० रुपयांचा दंड वसूल केला जात होता. आता मात्र मास्क न लावणाऱ्यांकडून एक हजार रुपयांचा दंड वसुल केला जाणार आहे. त्यामुळे विनामास्क फिरणाऱ्यांना चांगलाच आर्थिक फटका बसणार आहे.

याशिवाय दुसऱ्या वेळेस मास्क न लावता आढळून आल्यास थेट फौजदारी गुन्हा दाखल होणार आहे. त्यामुळे तोंडावर मास्क लावण्याची काळजी घ्यावी लागणार आहे. दंड वसूल करणे हा उद्देश नसून नागरिकांना याची जाणीव व्हावी, यासाठी दंडाची रक्कम वाढविण्यात आली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. याशिवाय किराणा दुकानात गर्दी करणाऱ्यांना २००, तर दुकानदारालाही ५०० रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. त्यासाठी शारीरिक अंतराचे नियम पाळावे लागणार आहेत.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : एरंडोलमध्ये ८२ सार्वजनिक गणेश मंडळांकडून उत्साहात गणरायाची स्थापना

पतीचा मंगळदोष दूर करण्यासाठी पत्नीच्या प्रायव्हेट पार्टला हळदी कुंकू लावून...; भोंदूबाबाकडून अघोरी कृत्य, हुंड्यासाठी छळ

Ganesh Chaturthi 2026: क्रिकेटपटूंचा ‘सुपर सिलेक्टर’ म्हणून प्रसिद्ध खजराना गणपती; दरवर्षी १ इंचाने वाढतो स्वयंभू मूर्तीचा आकार?

Ganesh Chaturthi 2026 : गणपतीचे जन्मस्थान कोणते माहितीय ? इथे कधीच होत नाही गणेश विसर्जन ! जाणून घ्या डोडीतालचे रहस्य

Asia Cup 2026 : 'त्यांच्याकडून आणखी काही मागू शकत नाही...', कर्णधार हरमनप्रीत कौरने चॅम्पियन झाल्यानंतर काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT