Latur News  
मराठवाडा

लातूर जिल्ह्यात पाऊल ठेवाल तर खबरदार ! दोन हजारांच्या दंडासह फौजदारी गुन्हा

विकास गाढवे

लातूर : टाळेबंदी वाढवतानाच सरकारने जिल्हा सीमाबंदी कायम ठेवली होती. तरीही मुंबई, पुणे व अन्य जिल्ह्यांतून अनेक लोक छुप्या मार्गाने जिल्ह्यात येत आहेत. या लोकांमुळे होणारा कोरोनाचा संसर्ग रोखण्याची गरज निर्माण झाली होती. यामुळेच जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी जिल्ह्यात अनधिकृत प्रवेश करणाऱ्यांविरुद्ध दोन हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. अशा लोकांविरुद्ध पोलिस ठाण्यांत गुन्हा दाखल करण्यासह त्यांना चौदा दिवस संस्थात्मक क्वारंटाइनही करण्यात येणार असून जिल्ह्यात अनधिकृत प्रवेश करणाऱ्यांना आता तीन कारवायांना एकाचवेळी सामोरे जावे लागणार आहे.


जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव बाहेरून येणाऱ्या व्यक्तींमुळेच होणार होता. आठ परप्रांतीयांच्या निमित्ताने अनुभव गाठीशी होता. यामुळे जिल्हा सीमेवरील तपासणी कडक करूनही जिल्ह्यात मुंबई, पुणे व अन्य जिल्ह्यांतून लोक येतच आहेत. लोकांना पकडून त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. काही ठिकाणी त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात येत आहे. त्यानंतर अशा व्यक्तींना चौदा दिवसांसाठी संस्थात्मक क्वारंटाइनही करण्यात येत आहे.

ग्रामीण भागात  अँटी कोरोना फोर्सच्या माध्यमांतून अशा व्यक्तींवर नजर ठेवली जात आहे. एवढी कडक कारवाई सुरू असतानाही बाहेरच्या जिल्ह्यांतून अनेक व्यक्ती जिल्ह्यात येताना दिसत आहेत. या व्यक्ती जिल्ह्यात येण्यासाठी पर्यायी रस्त्यांचा वापर करत असून पोलिसांना चुकीची माहिती देऊन जिल्ह्यात दाखल होत आहेत. याच पद्धतीने जिल्ह्यात आलेल्या आठ परप्रांतीय व्यक्तींमुळेच कोरोनाचा शिरकाव झाला होता. पुन्हा या लोकांमुळे जिल्ह्यात कोरोना पुन्हा पाऊल ठेवण्याची शक्यता वाढल्याने या लोकांना कडक प्रतिबंध करण्यासाठी जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी आदेश काढले आहेत.

पूर्वहंगामी कपाशी लावू नका, कृषी विभागाचे आवाहन

तहसीलदारांकडून दंडवसुली
जिल्ह्यात अनधिकृत प्रवेश करणाऱ्या व्यक्तींकडून प्रत्येकी दोन हजार रुपयांचा दंड वसूल करून तो जिल्हा आपत्ती प्रतिसाद निधीत जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी दिले आहेत. या आदेशामुळे बाहेरून येणाऱ्या व्यक्तींना पोलिसांत गुन्हा व चौदा दिवसांच्या संस्थात्मक क्वारंटाइनसोबत दोन हजार रुपये दंड मोजावा लागणार आहे. जिल्ह्यात बाहेरून आलेले अनेक व्यक्ती स्वतःहून वैद्यकीय तपासणी व संस्थात्मक क्वारंटाइनला प्रतिसाद देत आहेत. काही लोकांविरुद्ध सक्तीने कारवाई करावी लागत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेगावजवळ ओव्हरहेड केबल तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; अमरावती–पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्या खोळंबल्या

२०४७ पर्यंत एसटी बसेस १०० टक्के ईव्ही करणार, चार्जिग स्टेशन उभारण्याच्या कामाला गती देण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

Pune News : सुप्रिया सुळेंच्या आरोपांना पोलिस आयुक्तांचे उत्तर! आकडेवारीसह मांडले पुण्याच्या सुरक्षेचे वास्तव

Mumbai T20 League: शाश्वत जगतापचे खणखणीत शतक अन् ईगल ठाणे स्ट्रायकर्सचा बांद्रा ब्लास्टर्सवर दणदणीत विजय

Thane: महावितरणविरोधात आंदोलन अन्‌ राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यावर गुन्हा; प्रशासनावर नेत्याचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT