Seeds Selling Latur News 
मराठवाडा

जादा दराने ‍बियाणे विक्री केल्यास कारवाई, लातूरमध्ये बियाणे विक्रेत्यांवर नजर

हरि तुगावकर

लातूर : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण केली आहेत. जिल्ह्याचे या वर्षी खरिपामध्ये पाच लाख ६० हजार क्षेत्रावर पेरणी अपेक्षित आहे. यामध्ये सोयाबीन हे मुख्य पीक असून तूर, मूग, उडीद व खरीप ज्वारी या पिकांची पेरणी केली जाणार आहे. बाजारपेठेत जादा दराने बियाणांची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कृषी विभागाची नजर राहणार आहे. अशा जादा दराने कोणी बियाणांची विक्री करीत असल्यास याची तक्रार तातडीने करावी असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.


यंदा सरासरी एवढा पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. यात शेतकऱ्यांनी बियाणे व खते खरेदी करताना अधिकृत दुकानदारांकडूनच खरेदी करावीत. दुकानदाराकडून पक्के बिल घ्यावे व बियाणाचे बिल, पिशवीवर लेबल जपून ठेवावे. एमआरपीपेक्षा जादा दराने विक्री करत असेल तर लगेच कृषि विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बियाणे व खते खरेदी करताना शेतकरी गटामार्फत बाजारातून निविष्ठा खरेदी कराव्यात त्यामुळे बाजारांमधील गर्दी कमी होईल आणि शेतकऱ्यांचा वाहतूक खर्च देखील वाचणार आहे. शेतकऱ्यांनी ७५ ते १०० मिलीमीटर पाऊस पडल्यानंतर पेरणीस सुरवात करावी. पेरणीपूर्वी बियाणास बुरशीनाशक व जैविक संघाची बीजप्रक्रिया करुनच पेरणी करावी. सोयाबीन तूर, मूग व उडीद या पिकांची बीबीएफ पेरणी यंत्राव्दारे पेरणी करावी. बीबीएफवर पेरणी केल्यास पाऊस कमी झाल्यास किंवा जास्त झाल्यावर ही फायदा होतो. त्यामुळे अशा पद्धतीने पेरणी करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.


सोयाबीन पिका बाबतीत शेतकऱ्यांनी घरचे योग्य बियाणे पेरणीसाठी वापरावे. घरचे बियाणे पेरणीसाठी वापरताना त्याची उगवणशक्ती तपासावी. उगवण शक्ती ७० टक्के आल्यास एकरी ३० किलो बियाणे पेरावे व उगवणशक्ती ६९ टक्के आल्यास एकरी ३५ किलो बियाणे पेरावे. साठपेक्षा कमी आल्यास ते बियाणे पेरणीसाठी वापरु नये. त्याचबरोबर बियाण्यास पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करावी.
दत्तात्रय गवसाने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 1st T20I: शे होप पुन्हा नडला, पण पदार्पणवीर नमन धीरने दाखवला इंगा! रुदरफोर्डच्या आक्रमणाने विंडिज १७० धावा पार

Vidhan Parishad Election : विधान परिषद निवडणुकीच्या प्रभारीपदी चंद्रकांत पाटील; निवडणूकप्रमुखपदी राजेश पांडे

Delhi High Voltage Drama : राहुल गांधी, प्रियांका गांधी यांना पोलिसांनी घेतले ताब्यात; बळाचा वापर केल्याने दिल्लीत तणावाचे वातावरण

Car Accident : तिरुपतीहून परतणाऱ्या देगलूरच्या भाविकांच्या कारला अपघात; कृषी व्यावसायिक ठार, चार जखमी

Pune Teachers Constituency Election : शिवसेना भाजपमध्ये बंडखोरी, पुणे शिक्षक अर्ज दाखल; भाजपच्या कौस्तुभ गावडे यांच्याविरोधात शिवसेनेचे चिवटे रिंगणात

SCROLL FOR NEXT