नांदेड: घोरपड हा सरपटणाऱ्या प्राण्यांपैकी एक पाल, सारडा, यांच्या प्रवर्गातील प्राणी आहे. तर घोरपड ही सापा प्रमाणे आपली कातडी सोडत असते. मराठीमधे घोरपड तर इंग्लिश मध्ये मॉनिटर असे म्हणतात तर व्हॅरॅनस बेंगॉलेन्सिस ही घोरपडीची जात भारतात जवळजवळ सर्वत्र आढळते. घोरपड ही अंगाने तशी जाड कातडीची असते, या प्राण्याला उष्ण आणि ओलसर हवा मानवते त्यामुळे हा प्राणी नदी नाल्यांच्या परिसरात राहतो. घोरपडीने शेपुट मारल्यास पुरुष नपुसक होतो, तेल मिळते असे काही गैरसमज आहेत.
घोरपड हा सरपटणारा सरडा प्रजातीमधील संकटग्रस्त वन्यप्राण्यातून एक आहे. अंधश्रद्धेमुळे घोरपड हा प्राणी वाढत्या शिकारीमुळे संकटग्रस्त झाला आहे. त्याचबरोर या प्राण्या विषयी गैरसमजही आहेत.घोरपडीच्या चरबीपासून एक प्रकारचे तेल बनवण्यात येते. हे तेल सांधेदुखी वर लावल्यास सांधेदुखी पूर्णपणे बरी होते असा समज आहे. घोरपडीचे तेल वातविकारांवर उपयोगी पडते हा केवळ गैरसमज आहे. त्यामुळे असे म्हणतात की घोरपड ने शेपटी मारल्यास ती व्यक्ती कधीही बाप होऊ शकत नाही असा समज आहे पण हा केवळ गैरसमज आहे.
हेही वाचा...नांदेडच्या झेडपीला लागले निवडीचे वेध
नखांनी खडकारळ भागास घट्ट राहते
घोरपड तिच्या नखांनी खडकाळ कठिण भागास घट्ट धरून राहू शकते. म्हणून पूर्वीच्या काळी किल्ल्यांवर, अथवा उंच भूस्तरांवर चढताना घोरपडीच्या कमरेस दोर बांधून तिचा चढाईसाठी उपयोग करून घेत होते. हिच्या पायाच्या नख्यांमुळे ही कुठेल्याही भिंतीवर दगड आणि डोंगर, कड्या कपाऱ्यातून सहज रित्या चढू शकते आणि याचा उपयोग त्या काळी शिवाजी महाराजांच्या मावळ्यांना झाला होता. तान्हाजी मालुसरे यांनी सुद्धा हिचे नाव यशवंती असे ठेवले होते त्याचप्रमाणे ते हिच्या मदतीने सिंहगड चढले होते.
घोरपड शेपटी का मारते
घोरपड शेपटी का मारते हे तुम्हाला माहीत आहे का तर तिला कोणी डिवचले किंवा तिच्यावर हल्ला होणार आहे असे तिला वाटल्यास ती मागचे दोन्ही पाय वर करुन आपली शेपटी आपल्या शत्रूवर मारत असते. का मारते तर आपले शत्रुंपासून रक्षण करण्याकरिता. पण आपल्या समाजात जुन्या आणि कालबाह्य झालेल्या काही गोष्टी आहेत.
घोरपडीची वाढ व उंची
घोरपड हा सरडा प्रजातीचा एक सरपटणारा प्राणी असलातरी ती तिचे वजन हे जास्तीत जास्त शंभर किलोपर्यंत तर उंची जवळपास पाच फुटापर्यंत वाढू शकते. पण भारतात एवढी महाकाय घोरपड दुर्मीळ आहे. जमीनीमध्ये विशिष्ट खोलीच्या अंतरात बिळ करुन राहणारी घोरपड भक्षाच्या शोधात बाहेर पडते. चार पायावर कंबरेला जोर देवून धावते.
येथे क्लिक करा...तामशाच्या ‘गोदावरी’ची अशीही शेती : कशी ते वाचा
कायद्याने गुन्हा
घोरपड हा वन्यजीवांमधील संकटग्रस्त प्राणी असून घोरपडीला मारणे हे कायद्याने गुन्हा आहे. तसे दिसून आल्यास तुम्हाला तीन वर्ष कारावास आणि २५ हजार रुपयांचा दंडाची शिक्षा होऊ शकते. त्यामुळे घोरपड या प्राण्या विषयी गैरसमज केवळ अंधश्रद्धा आहे.
केवळ गैरसमज
घोरपड हा सरपटणाऱ्या सरड्याची एक प्रजात आहे. बचावासाठी चावा घेणे अथवा आपल्या मजबुत शेपटीने हल्ल्याचा प्रतिकार करणे हा या प्राण्याचा गुणधर्म आहे. मास खाल्याने काही होत नाही तर, शेपटाच्या मारापासून नपुसकता येवू शकते हा केवळ अंधश्रध्दा आणि बालीष गैरसमज आहे.
सिद्धार्थ सोनवणे ( संचालक सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्र)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.