Illegal gutkha seized by balapur police Two accused arrested sakal
मराठवाडा

हिंगोली : अवैध गुटखा विक्रेते पोलिसांच्या जाळ्यात

सव्वा आठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त; दोघांवर कारवाई

सय्यद अतिक

आखाडा बाळापूर : नांदेड येथून हिंगोली कडे मधल्या मार्गाने एका कारमध्ये शासनाने बंदी घातलेल्या अवैध गुटखा चोरट्या मार्गाने विक्री करण्यासाठी नेत असताना, बाळापुर पोलीसांनी चिखली शिवारात स्विफ्ट कार तसेच अवैध गुटखा पोलिसांनी पकडून आठ लाख २३ हजार ३८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोन आरोपींना अटक करण्याची कार्यवाही शुक्रवारी केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की आखाडा बाळापुर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड यांना गुप्त माहिती मिळाल्याने त्यांनी नांदेड नागपूर या राष्ट्रीय महामार्गावरून चिखली शिवारामधुन मधल्या मार्गाने जाणाऱ्या कार क्रमांक एम एच ०४ जीडी ३३२० ला थांबून विचारपूस केली असता गाडीमध्ये शासनाने बंदी घातलेले अवैध गुटखा पुड्याचे बॉक्स त्याची किंमत तीन लाख २२ हजार रुपये व इतर १३८० रुपये व स्विफ्ट कार पाच लाख रुपये असा एकूण आठ लाख २३ हजार ३८० रुपयाचा मुद्देमाल जप्त करून आरोपींना अटक करण्यात आली आहे.

याबाबत आखाडा बाळापुर पोलिस स्थानकामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड यांच्या फिर्यादीवरून रसूलखान सिकंदर खान व शेख रसूल शेख मुजीब दोन्ही रा. हिंगोली या दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली जमादार शेख बाबर हे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: मुंबई लोकल प्रवाशांसाठी अलर्ट! आता 'इथून' ट्रेनमध्ये चढलात तर गुन्हा दाखल होणार; रेल्वेचा मोठा निर्णय

Supreme Court: सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय! 'त्या' नागरिकांना परदेशी घोषित करण्याच्या आदेशाला स्थगिती

Jejuri Wari Accident: 'पंढरीच्या वाटेवर होतो, अन् मागून ट्रक आला अन्..' जखमी वारकरी महिलेने सांगितला थरारक अनुभव

Latest Marathi News Live Update : दिल्लीच्या कडकडडूमा न्यायालयाने अंकित शर्मा यांची हत्या आणि दंगल यांसारख्या गुन्ह्यांसाठी ताहिर हुसेनला दोषी ठरवले

Snake Bite : कोळवण येथे सर्पदंश झालेल्या रुग्णाचा मित्र व घरातील नातेवाईकांच्या तत्परतेने वाचला जीव; कोळवण येथे सुसज्ज प्राथमिक आरोग्य केंद्र होणे गरजेचे

SCROLL FOR NEXT