Poster-Banner-Issue
Poster-Banner-Issue 
मराठवाडा

भाऊ, दादांना हटविले!

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद - महापालिका व पोलिस प्रशासनाने शनिवारी (ता. २८) अनधिकृत पोस्टर, बॅनर लावून शहराचे विद्रुपीकरण करणाऱ्यांविरुद्ध मोहीम सुरू केली. दिवसभरात नऊ पथकांनी २ हजार ५३ अनधिकृत जाहीर फलक हटविले. याबरोबरच अतिक्रमण हटाव विभागाच्या पथकाने महानुभाव आश्रमचौक ते पैठण रोडवरील अतिक्रमणांवर हातोडा चालवत रस्त्यावरील दुकानांचे शेड, कमानी काढून त्या जप्त केल्या. 

अनधिकृत फलकांवर कारवाई करण्यासाठी महापालिका व पोलिस प्रशासनाने संयुक्‍तपणे नऊ पथकांची नेमणूक करण्यात आली. कारवाईसाठी नेमलेल्या पथकांनी शनिवारी सकाळपासूनच विविध चौकांतील अनधिकृत जाहिरात फलक जप्त करण्याची मोहीम हाती घेतली. मोहिमेदरम्यान विविध पथकांनी औरंगपुरा, निरालाबाजार, समर्थनगर, व्हीआयपी रोड, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, गारखेडा परिसर, सातारा-देवळाई रोड, पैठण रोड, मध्यवर्ती बसस्थानक परिसर, रेल्वेस्टेशन रोड, जालना रोड आदी विविध ठिकाणी लावलेले पोस्टर, बॅनर, होर्डिंग्ज, झेंडे मनपाच्या पथकाने जप्त केले. दरम्यान, अतिक्रमण हटाव पथक सकाळी दहाच्या सुमारास महानुभाव आश्रम चौक परिसरात दाखल झाले.

पथकातील अधिकाऱ्यांनी रस्त्यावर आलेले दुकानाचे शेड, टपऱ्या, ओटे काढून घेण्याच्या सूचना संबंधितांना केल्या. त्यानंतर काही दुकानदारांनी स्वतःहून आपल्या टपऱ्या  काढून घेतल्या, तर काहींनी नकार दिला. यानंतर पथकाने त्या जप्त केल्या. महानुभव आश्रम चौकासह मनपाच्या पथकाने सातारा, देवळाई रोडवर असलेल्या टपऱ्यांवरही कारवाई केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT