jalna rain alert esakal
मराठवाडा

Jalna Rain News : जालना जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट; हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता

पावसाळ्याचे दोन महिने संपल्यानंतर जिल्ह्यात ५० टक्के ही पाऊस झालेला नाही

सकाळ वृत्तसेवा

जालना : मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. अशात मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने पुढील दोन दिवस जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. यंदा जिल्ह्याकडे पावसाने पाठ फिरवल्याचे चित्र आहे.

पावसाळ्याचे दोन महिने संपल्यानंतर जिल्ह्यात ५० टक्के ही पाऊस झालेला नाही. त्यात मागील काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे शेतकरीही चिंतेत आहे. दरम्यान, प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने बुधवारी (ता.दोन) आणि गुरूवारी (ता.तीन) जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.

या कालावधीमध्ये तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पाऊस व ताशी ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. तर शुक्रवारी (ता.चार) आणि शनिवारी (ता.पाच) हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे.

सर्व संबंधित यंत्रणेने खबरदारी घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान ता. एक जूनपासून मंगळवारपर्यंत २५२ मिलिमीटर पाऊस झाला आहे. गतवर्षी या काळात ४६१.९३ मिलिमीटर पावसाची नोंद झालेली होती.

मंगळवारी सकाळपर्यंत मागील चोवीस तासांमध्ये ३.५० मिलिमीटर पाऊस झाला. यामध्ये तालुकानिहाय मिलिमीटर पाऊस (कंसात एकूण) पुढीलप्रमाणे : जालना १.४० ( २६४.३०), बदनापूर १.४० (२५२.७०), भोकरदन ४.३० (२५२.३०), जाफराबाद ११.४० (२९३.१०), परतूर १.८० (१९९.९०), मंठा १.६० (२२८.३०), अंबड ३.१० (२८३.४०) आणि घनसावंगी ३.७० (२३१).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

Ladki Bahin Yojana: ''लाडकी बहीण योजनेचं पोर्टल बंद'' पुढे काय होणार? ठाकरेंचा सरकारला टोला

आमिर खान यांना 'सितारे ज़मीन पर' च्या प्रचंड यशानिमित्त देशभरातील एग्झिबिटर्सकडून विशेष सन्मान!

कॅन्सरग्रस्त दीपिका कक्करला भेटायला पोहोचली मराठमोळी सोनाली कुलकर्णी; दोघींचा नेमकं नातं काय?

ELI Scheme : रोजगारवाढीसाठी 'ईएलआय' योजना: पंतप्रधान मोदींकडून मंजुरी; साडेतीन कोटी नोकऱ्यांचे उद्दिष्ट

SCROLL FOR NEXT