file photo 
मराठवाडा

‘काेरोना’चा प्रभाव : बाजारपेठ गडगडली !

कैलास चव्हाण

परभणी : ‘काेरोना’ व्हायरसच्या भितीमुळे शहरातील बाजारपेठेसह अन्य व्यवहारावर मोठा परिणाम झाल्याचे दिसुन येत आहे. केवळ शॉपींग मॉलमधील दुकाने, चित्रपटगृह, व्यायामशाळा बंद राहिल्या. तसेच शहरातील शाळांना सुट्या दिल्याने विद्यार्थी घरीच थांबले होते.
‘काेरोना’ मुळे प्रशासनाने निर्बंध लादण्यास सुरुवात केली आहे. पहिल्या टप्यात जिल्ह्यातील गर्दीचे कार्यक्रम, यात्रा, उत्सव रद्द केले आहेत. तसेच अठवडी बाजार देखील रद्द केले आहेत. आता जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील मोठ्या शॉपींग मॉलमधील दुकानेदेखील बंद करण्याचे आदेश दिले आहेत. सुरुवातीला अत्यावश्यक सेवा वगळुन सर्व अस्थापना, दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. मात्र, पुन्हा सुधारीत आदेश काढत केवळ मॉलमधील दुकाने बंद ठेवण्याचे आदेश काढले आहेत. त्याचा परिणाम म्हणून सोमवारी (ता.१६) शहरातील मुख्य बाजारपेठत तुरळक गर्दी दिसुन आली. 


कापडा मार्केटमध्ये शुकशुकाट
कपडा मार्केट परिसरातदेखील शुकशुकाट अढळुन आला. अन्य दुकाने सुरु असली तरी, देखील ग्राहकांची गर्दी नसल्याने विक्रेते, व्यापारी हतबल झाले आहेत. शहरातील चित्रपट गृह आणि व्यायामशाळा बंद करण्यात आल्या आहेत. तसेच आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत. शहरी भागातील शाळांना सुट्या जाहीर केल्याने परीक्षा केंद्र असणाऱ्या शाळेत केवळ दहावी-बारावीचे परीक्षार्थी आले होते. बच्चे कंपनीनी सकाळच्यावेळेत सुट्टीचा आनंद मैदानावर घेतल्याचे चित्र होते.

मोंढ्यात परिणाम
परभणी शहरातील बाजार समितीमधील मार्केट यार्डातदेखील तुरळक गर्दी दिसुन आली. ऐरवी सुट्टीचा दिवस वगळता अन्य दिवशी मोठी गर्दी असते. खरेदी, विक्रीची मोठी उलाढाल होत असते. शेतमालासह अन्य साहित्यांची विक्रीचे व्यवहार होत असतात. परंतु, दोन दिवसापासून या व्यवहारावर मोठा परिणाम झाल्याचे चित्र आहे.

हेही वाचा - ‘कोरोना’चा परिणाम : बस, रेल्वेची ओसरली गर्दी !

मास्कची विक्री वाढली
‘काेरोना’च्या भितीमुळे घराबाहेर पडताना तोंडाला मास्क लावणाऱ्यांची संख्या मोठी वाढली आहे.तसेच मास्क न मिळाल्यास रुमाल घट्ट बांधुन बाहेर पडत आहेत.शहरातील अॅटो चालक देखील मास्क लावुनच प्रवाशांशी बातचित करत आहेत.


विक्रीत निम्याने घट
सध्या लग्नसराई असतानाही ‘काेरोना’ व्हायरसच्या भितीमुळे ग्राहकांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे कपडा बाजारात विक्रीत निम्याने घट झाली आहे.
 माऊली शिंदे, कापड दुकानदार
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Iran Tension: पाकिस्तानची मध्यस्थी निष्फळ ठरली! इराणसोबतचा करार संपुष्टात; डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, तणाव वाढणार

Persistent Bone Pain: हाडांमध्ये सतत वेदना होतात? दुर्लक्ष करू नका; असू शकतात 'या' गंभीर आजारांचा इशारा

Water Crisis: आज पूर... उद्या पाण्यासाठी युद्ध? २०५० पर्यंत भारत 'Water Scarce' देश होण्याचा इशारा

Latest Marathi News Live Update : पुण्यातील सर्वच मुख्य रस्त्यांवर वाहतूक कोंडी

UP Gangster Act: यूपीच्या कुख्यात गँगस्टरला महाराष्ट्रात मोठा झटका; उमरग्यातील दाल मिलसह १०० कोटींची मालमत्ता जप्त..

SCROLL FOR NEXT