file photo 
मराठवाडा

शेतकऱ्यांसाठी घेतला महत्वपूर्ण निर्णय....काय ते वाचा

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : जिल्ह्यातील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रांतर्गत येणाऱ्या सर्व प्रकारच्या कापूस खरेदी केंद्रांना साथरोग संसर्ग प्रतिबंधात्मक आदेशांचे व स्वच्छतेच्या सर्व नियमांचे पालन करण्याच्या अटीस अधीन राहून परवानगी जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी दिली आहे.

शेतमालाची हमीभावाने खरेदीस परवानगी
देशात सध्या कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनामार्फत विविध उपाययोजना करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाकडून वेळोवेळी मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयाने ता. १५ एप्रिल रोजी सुधारीत मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या असून सदर मार्गदर्शक तत्त्वानुसार कृषि उत्पन्न बाजार समितीमधील कृषी शेतमालाची खरेदी-विक्री व कृषि शेतमालाची हमीभावाने खरेदी करण्यास परवानगी दिली आहे.

सीसीआय, पणनकडून होणार खरेदी
सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे प्रधान सचिव (पणन) यांनी ता. १७ एप्रिल रोजी भारतीय कापूस निगम (सीसीआय) व महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ मर्यादित मुंबई यांच्यामार्फत कापसाची हमी भावाने खरेदी सुरु करण्याची परवानगी देण्याबाबत राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांना सूचना दिल्या आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी मंगळवार ता. १५ एप्रिल रोजी नांदेड जिल्ह्यातील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रांतर्गत येणाऱ्या सर्व प्रकारच्या कापूस खरेदी केंद्रांना साथरोग संसर्ग प्रतिबंधात्मक आदेशांचे व स्वच्छतेच्या सर्व नियमांचे पालन करण्याच्या अटीस अधीन राहून परवानगी दिली आहे.

हमी दराने होणार खरेदी
शेतकऱ्यांनी त्यांच्या कापसाची हमीभावाने खरेदी करण्यासाठी महसूल प्रशासनाने दिलेल्या ऑनलाईन लिंकवर ता. २५ एप्रिल पर्यंत प्राथमिक नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानंतर संबंधित कृषि उत्पन्न बाजार समितीकडून शेतकऱ्यांना लघुसंदेश पाठविण्यात येणार असून लघुसंदेशामध्ये नमूद दिनांकास शेतकऱ्यांने सात-बारावरील पीकपेरा व उत्पादकता विचारात घेऊन फक्त एफएक्यु दर्जाचा कापूस संबंधीत खरेदी केंद्रावर विक्रीसाठी आणावयाचा आहे.

सामाजीक अंतर पाळण्याचे आवाहन
एखाद्या शेतकऱ्यांच्या नावावर यापुर्वी कापूस विक्री झालेली असल्यास त्यांचे नावावर पुन्हा कापूस खरेदी केली जाणार नाही. नॉन एफएक्यु दर्जाचा कापसाच्या खरेदीसाठी बाजार समितीच्या परवानाधारक व्यापाऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे. कापूस खरेदी प्रक्रिया सुरळीत होण्याच्या दृष्टीने पणन संचालक पुणे यांनी तालुकास्तरावर तालुका, उपसहायक निबंधक, सहकारी संस्था, कापूस पणन महासंघाचे प्रतिनिधी व बाजार समितीचा सचिव यांनी समिती गठीत केली आहे. शेतकऱ्यांनी कापूस खरेदी केंद्रावर सामाजिक अंतर व स्वच्छतेचे पालन करुन खरेदी प्रक्रिया सुरळीत पार पाडण्याचे आवाहन, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) प्रवीण फडणीस यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold-Silver Rate Today: सोनं-चांदीच्या भावात मोठी घसरण! 11 सप्टेंबरला पुन्हा दर कोसळणार? जाणून घ्या ताजी अपडेट

‘त्याला माझी इनसिक्युरिटी वाटायची’; अनेक वर्षांनंतर नीना गुप्तांनी उघड केलं गुपित, म्हणाल्या...'माझ्यापेक्षा जास्त...'

ChatGPT's 80s Photo Trend: Instagram वर व्हायरल होतोय 'ChatGPT ’80s Photo Trend'; 'हा' सोपा प्रॉम्प्ट वापरून तयार करा तुमचा ८० च्या दशकातील रेट्रो लूक!

Marathi News Live Updates : लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ; शेतकऱ्यांच्या स्वप्नांची माती, मायबाप सरकारला आर्त हाक

Share Market Today: इराणच्या अमेरिकेला धमकीने शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 500 अंकांनी खाली; कोणत्या शेअर्सला मोठा फटका?

SCROLL FOR NEXT