Beed Lock Down Updates 
मराठवाडा

लॉकडाऊन... पोटाला पिळ की नातेवाइकांचा तडफडून मृत्यू!!

दत्ता देशमुख

बीड : लॉकडाउन लागलं, हातावर पोट असणाऱ्यांचे काय? असा वास्तववादी प्रश्न समोर आला आहे. पोटाला पिळ पडून वेदना होणार हे निश्चीत. पण, ही वेदना सहन करायची का? घरातलं कोणी डोळ्यादेखत तडफडून मरतंय हे पाहायचं आणि आयुष्यभर स्वत:ला कोसत बसायचं, अशी दुसरी बाजूही आहे. वेदना कोणतीच बरी नाही पण तरीही दुसरी बाजूही समजून घ्यावी लागेल. यासाठी ज्यांच्या घरातील कोणाचा कोरोना विषाणू संसर्गाने मृत्यू झाला आणि ज्यांना हा संसर्ग झाला त्यांना विचारले पाहिजे नेमके बरे काय?


कोरोना विषाणूचा संसर्ग १२ महिन्यांपूर्वी समोर आला. हा विषाणू नेमका कोठून आला, कसा आहे, त्याचा संसर्ग झाल्यानंतर हेच होईल, असे केल्याने काही होणारच नाही, संसर्गानंतर हा उपचार केल्याने खात्रीशीर इलाज होईलच, लस टोचल्यानंतर संसर्ग होणारच नाही यासह संसर्गाबाबत असणाऱ्या कैक प्रश्नांचे अद्याप १०० टक्के खात्रीशीर उत्तर व इलाज सापडलेला नाही. जिल्ह्यातच पाहिले तर आज २३ हजारांवर रुग्ण आणि तब्बल सव्वासहाशेंपर्यंत मृत्यू झाले आहेत. ग्रामीण आरोग्य यंत्रणेत ६११ मृत्यूची नोंद आहे तर शहरी यंत्रणेकडे हाच आकडा ६२७ आहे. ज्यांचे मृत्यू चाचणीपूर्वी झाले असे शेकडो आहेत.


तरीही संशोधनानंतर असलेले सर्वोत्तम पर्याय उपचारात आणि प्रतिबंधासाठी उपाय योजिले जात आहेत. त्यातलाच प्रतिबंधासाठी लॉकडाउन हा एक पर्याय आहे. त्याच्या झळा शेतकरी, कामगार, मजूर आणि व्यापारी अशा सर्वच घटकांना बसतात. अगदी काही देशोधडीलाही लागतात हाही पूर्वानुभव आहे. त्यामुळे विरोध सहाजिकच आहे. पण, कोरोना झाल्यानंतर त्या रुग्णाची, कुटुंबाची काय दशा होते हे बाधित झालेल्यांनाच माहीत. ज्यांच्या घरातले लोक डोळ्यादेखत या आजाराने मरतात त्यांना याच्या वेदना माहितच आहेत.
विशेष म्हणजे कोरोना संसर्ग आणि मृत्यू गरीब - श्रीमंत हा भेदभाव करत नाहीत. अगदी सर्वबाबी उपलब्ध असताना, सर्वोच्च सुविधा असलेली उपचार यंत्रणा असतानाही मृत्यू झालेच. काही लोक तर बोलता बोलता या आजाराने गेले.

दवाखान्याच्या खाटेवर गेल्यानंतर समजते आजार काय असतो. त्यामुळे लॉकडाउनने अडचणी, नुकसान आणि गरिबांच्या जेवणाची भ्रांतही निर्माण होईल. पण, कोरोना झाल्यानंतर होणारी हानी आयुष्यात भरून निघणारी नसते हेही निश्चित. आता लॉकडाउन करण्याने हे काही होणार नाही असे म्हणता येणार नाही. पण, एखाद्या आपत्तीत (जसे महापूर, वादळ) सर्वच साफ होते. तेव्हा गेले काय, हे मोजण्यापेक्षा शिल्लक काय? याचे मोजमाप योग्य ठरते. तशीच ही आपत्ती आहे. जेवढे शक्य आणि हाती आहे तेवढे तर प्रयत्न करायलाच हवेत. यात शासनाने गरीब घटकांचा विचार करावा आणि त्यांच्या हाती निश्चित काहीतरी द्यावे ही मागणीही योग्यच आहे. लॉकडाउनचा निर्णय घेणाऱ्या प्रशासनानेही शासनाला ही पोटतिडकीची मागणी कळवावी आणि मान्य करण्यासाठी आग्रही भूमिका घ्यावी.


Edited - Ganesh Pitekar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Bus Accident Video: पुण्यात बसचा थरार! चालक उतरला अन् बस चालू लागली; चालत्या गाडीतून प्रवाशांच्या उड्या

Asim Sarode: अ‍ॅड. असीम सरोदे यांची सनद रद्द करण्यास ‘बीसीआय’ची स्थगिती; आदेशात नेमकं काय म्हटलं?

Mangalwedha News : नगराध्यक्षपदाच्या तीन अर्जासह नगरसेवकाच्या दोन अर्जावरील निकालाची मंगळवेढेकरांना प्रतीक्षा

Angar Election: राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद का झाला? 'या' होणार बिनविरोध नगराध्यक्ष?

IND W vs BAN W: वर्ल्ड कप जिंकल्यानंतर होणारी भारतीय संघाची मालिका BCCI कडून स्थगित! जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT