Pune Crime News sakal
मराठवाडा

Crime News: अंध पतीसमोरच अंध पत्नीवर तीन वेळा अत्याचार, मदतीच्या बहाण्याने...

एका व्यक्तीने दाम्पत्य नेत्रहीन असल्याचा गैरफायदा घेत अंध महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप

सकाळ डिजिटल टीम

Pune Crime News: गेल्या काही दिवसांमध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचारांमध्ये मोठ्या वाढ होताना दिसत आहे. अशातच आता महाराष्ट्राला हादरवणारी अत्याचाराची घटना अकोल्यातून समोर आली आहे. अंध पतीच्या समोरच अंध पत्नीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

अमरावतीहून मुलीच्या भेटीसाठी दिग्रसला जात असताना मदतीच्या कारणाने नराधमाने हे पाशवी कृत्य केलं आहे. विरोध करणाऱ्या पतीला गळा दाबून बाजूला बसवत तीन वेळा महिलेवर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे.

अकोला शहरातील बस स्थानकावर अंध महिला आपल्या पतीसह रात्री बसमधून खाली उतरली. रात्रीची वेळ असल्यामुळे त्यांना वाडेगावला जाण्यासाठी जुन्या बस स्थानकावर जण्यासाठीची बस अर्धा तास उशिरा असल्यामुळे आणि त्यातच पाऊस सुरू असल्याने त्यांना तिथे जाणं शक्य नव्हतं. त्यामुळे त्यांनी रेल्वे स्थानकावर रात्रीचा मुक्काम करायचं ठरवलं. (Latest Marathi News)

यावेळी पत्ता विचारला असता त्या व्यक्तीनेच दोघांनाही अकोट फैल परिसरामध्ये नेलं. दोघंही अंध असल्याच्या संधीचा फायदा घेत आरोपीने महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप आहे.

तुझा आणि तुझ्या पतीचा चाकू भोसकून खून करेन, अशी धमकी देत तब्बल तीन वेळा तिच्यावर जबरी अत्याचार केल्याची माहिती आहे. या प्रकरणी सिव्हिल लाइन पोलिस ठाण्यात काल रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या अत्याचार करणारा व्यक्ती अटकेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thalapathy Vijay : मुख्यमंत्री थलपती विजय यांचे सरकार डळमळीत?, फुटण्यासाठी एका आमदाराला ३५ कोटींची ऑफर, तिघांना अटक

LPG Price Today: कमर्शियल LPG सिलेंडर 183 रुपयांनी स्वस्त झाल्यानंतर आता घरगुती गॅसचे दर जाहीर! पाहा तुमच्या शहरातील नवे भाव

Belgium vs Senegal : ३ मिनिटांत बाजी पलटली, बेल्जियमने ०-२ अशा पिछाडीवरून मॅच फिरवली; लढवय्या सेनेगलचा दुर्दैवी पराभव

Latest Marathi News Live Update : चर्चगेट रेल्वे परिसरात झाड कोसळून तीन वाहनांचे नुकसान; पावसाची संततधार कायम

FDA Crime : तुकाराम मुंढेंचा सर्वात मोठा दणका! संभाजीनगर शॉक; प्रसिद्ध 'आईच्या गावात' अन् 'यल्ला यल्ला' हॉटेलला टाळे

SCROLL FOR NEXT