in group development officer office one try to self immolation for water Sakal
मराठवाडा

Chakur News : चाकूर गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात पाण्यासाठी आत्मदहनाचा प्रयत्न

आक्रमक महिला व पुरूषांचा जमाव पंचायत समितीसमोर

प्रशांत शेटे

चाकूर : हणमंतजवळगा (ता.चाकूर) गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून पाणी द्या या मागणीसाठी ग्रामस्थांनी शुक्रवारी (ता.२४) सकाळी अकरा वाजता पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात आत्मदहनाचा प्रयत्न केला, जवळपास पाचशे महिला व पुरूषाचा जमाव कार्यालयाबाहेर पाणी द्या या मागणीच्या घोषणा देत होते.

हणमंतजवळगा गावाला हिंपळनेर येथील साठवण तलावातून पाणीपुरवठा योजना कार्यान्वीत करण्यात आली आहे. हिंपळनेर येथील काही व्यक्तींनी या पाणीपुरवठा योजनेच्या विहीरीवरील मोटारी व पाईपलाईची नासधुस केली आहे.

यामुळे पंधरा दिवसापासून गावाचा पाणीपुरवठा बंद झाला आहे. याबाबत ग्रामस्थांनी जिल्हा परिषद, पंचायत समितीकडे निवेदन देऊन सदरील व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी केली परंतू प्रशासनाकडून याची दखल घेतली जात नाही तसेच पाणीपुरवठाही सुरळीत केला जात नाही. पाण्याअभावी ग्रामस्थांना भटकंती करावी लागत असून जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

ही समस्या तातडीने सोडवावी अन्यथा पंचायत समिती कार्यालयामध्ये आत्मदहन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिल्या होता त्यानुसार शुक्रवारी सकाळी गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात पाच ते सहा व्यक्तींनी अंगावर डिझेल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला यावेळी पोलिस व कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांच्या हातातील डिझेलच्या बाटली काढून घेतल्या.

जवळपास पाचशे महिला व पुरूषांचा जमाव पंचायत समिती कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न करीत असताना पोलिसांनी त्यांना गेटवर अडविले. गावातील पाणीपुरवठा तात्काळ सुरु करावा, पाणीपुरवठा योजनेवरील मोटारी व पाईपलाईनची नासधुस केली आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक झाले होते.

गटविकास अधिकारी वैजनाथ लोखंडे, पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम, पोलिस उपनिरीक्षक कपील पाटील यांनी ग्रामस्थांना शांत राहण्याचे आवाहन केले परंतू जमाव आक्रमक झाला होता. या आंदोलनात रामदास बालने, तुकाराम केंद्रे, विठ्ल उदगीरे, व्यंकट बेडदे यांच्यासह ग्रामस्थ सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: हा व्हिडिओ खास आहे... नातं रक्ताचं नव्हतं, पण... जंगलात वाजली शहनाई, CRPF जवानांनी निभावलं वधूच्या भावाचं कर्तव्य

Ashadhi Wari 2025 : बंधुभेटीच्या सोहळ्याने अवघे वैष्णव भावुक; संत ज्ञानेश्वर महाराज-संत सोपानदेवांच्या भेटीचा सोहळा अनुभवण्यासाठी गर्दी

Satara Crime : धोमच्या चोरीप्रकरणी एकास अटक; नवनाथ दत्त मंदिरातील दानपेटी फोडून रोख रक्कम लंपास

Public Health Corruption: आरोग्य खात्यात साहित्य खरेदीत गैरव्यवहार; आमदार डाॅ. राहुल पाटील यांचा विधानसभेमध्ये आरोप

Latest Maharashtra News Updates : सीमाप्रश्‍नी तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षपदी धैर्यशील माने यांची नियुक्ती, महाराष्ट्र सरकारकडून प्रसिद्धीपत्रक जारी

SCROLL FOR NEXT