hingoli market open 
मराठवाडा

हिंगोलीत सकाळी दहा ते रात्री आठपर्यत राहणार दुकाने सुरु; रुचेश जयवंशी

हिंगोली जिल्ह्यात कोरोनाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील आस्थापना व दुकाने चालू करण्यासाठी जिल्ह्यातील रुग्णांची सद्यस्थितीचा विचार करुन शासन स्तरावरुन मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.

राजेश दार्वेकर

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात शनिवारपासून ( ता. १२ ) जून सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेतील दुकाने आस्थापना पुढील आदेशापर्यंत सुरु राहणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी शुक्रवारी (ता. ११ ) उशिरा काढले आहेत. हिंगोली जिल्हा तिसऱ्या स्तरातून दुसऱ्या स्तरात आल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र धार्मिक स्थळे, शाळा, महाविद्यालय, खासगी शिकवणी वर्ग बंदच राहणार आहेत.

हिंगोली जिल्ह्यात कोरोनाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील आस्थापना व दुकाने चालू करण्यासाठी जिल्ह्यातील रुग्णांची सद्यस्थितीचा विचार करुन शासन स्तरावरुन मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. सदर शासन निर्देशानुसार जिल्ह्यातील रुग्णांची सद्यस्थिती नुसार हिंगोली जिल्हा लेवल दोन मध्ये येत असल्याने दिलेल्या सूचना व जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता शनिवार (ता. १२) पासून आस्थापना व दुकाने उघडण्यासाठीच्या वेळेत व नव्याने उघडण्यात येणाऱ्या आस्थापनाबाबत आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.

हेही वाचा - कोरोनाच्या दोन्ही लाटेतील निर्बंध शेतकऱ्यांच्या मुळावर. दहा जिल्ह्यांमध्ये शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत.

जिल्ह्यातील किराणा दुकाने, भाजीपाला विक्रेते, फळ विक्रेते, बेकरी, मिठाई विक्रेते, सर्व प्रकारचे अन्न विक्रते ( चिकन , मटन , पोल्ट्री ), पाळीव प्राणी खाद्य विक्रेते, पावसाळी हंगाम पूर्व साहित्य विक्रेते यांची दुकाने, आस्थापना सकाळी दहा ते रात्री आठ या वेळे प्रमाणे चालू करण्यास परवानगी राहील. सदर कालावधीत दुध विक्री केंद्र विक्रेते यांना दैनंदिन सकाळी सात ते रात्री आठ वाजेपर्गत उघडण्यास परवानगी असेल. कुरीअर सेवा या दैनंदिन चालू राहतील, कृषी संबंधित सर्व दुकाने या वेळी सुरु राहतील.

जिल्ह्यातील खानावळ, रेस्टॉरट यांना कोरोना नियमांचे पालन करुन ग्राहकांच्या दहा टक्के उपस्थितीच्या मर्यादेत उपडण्यास परवानगी राहील. कार्यालयीन उपस्थिती शंभर टक्के आयोजित करण्यात आलेले लग्न सोहळे शक्यतो नोंदणी पद्धतीने पार पाडावेत. जर पारंपारिक पद्धतीने लग्न आयोजित करावयाचे असल्यास वर- वधू मिळून केवळ ५० व्यक्तींच्या उपस्थितीत करण्यात यावे, अंत्यसंस्कारासाठी केवळ २० नागरिकांना परवानगी असेल खाजगी वाहनाद्वारे लांब पल्ल्याच्या रेल्वेने प्रवास करण्यासाठी परवानगी असेल. सार्वजनिक, मालकीची वाहने शासन निर्देशाप्रमाणे पूर्णक्षमतेने वाहतूक करण्यास परवानगी असेल सर्व बँका या कालावधीत शासकीय कामकाजासाठी, नियमित वेळा पत्रकानुसार सुरु ठेवण्यास परवानगी असेल.

येथे क्लिक करा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साधला कापशी सरपंचांशी संवाद

जिल्ह्यातील सर्व प्रकारचे उद्योग सुरु ठेवण्यास शासन निर्देशानुसार कोरोना नियमांचे पालन करुन परवानगी असेल. केशकर्तनालय आणि ब्यूटी पार्लर यांना केवळ ४० टक्के ग्राहकांच्या क्षमतेने दुकाने उघडण्यास परवानगी असेल. शाळा महाविद्यालये, खाजगी शिकवणी वर्गबंद असतील.

संबंधितांनी या आदेशाचे पालन करावे तसेच आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित अधिकारी यांनी पार पाडावी असे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी निर्गमित करण्यात आले आहेत.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sant Tukaram Maharaj Palkhi : उद्योगनगरी भक्तिमय! संत तुकाराम महाराज पालखीचे शहरात स्वागत

Flood Alert: भीमाशंकर-आहुपे पट्ट्यात मुसळधार पावसाने घोडनदी तुफानी; शिरूर शहरातील कोल्हापूर पद्धतीचे २७ बंधारे ओव्हरफ्लो

Saath Chal : पिंपरीत ‘जलसंवर्धन’ वारी; ‘सकाळ माध्यम समूह’ व फिनोलेक्स केबल्स यांचा ‘साथ चल’ उपक्रम

Junnar Heavy Rains: जुन्नरच्या आदिवासी पट्ट्यात मुसळधार पावसाचा कहर; रस्ते, पूल जलमय, शेतपिकांचे मोठे नुकसान

Mumbai News : फुले, फुगे अन् 'I Love You'... 'सुहागरात एक्स्प्रेस'चा व्हिडिओ व्हायरल; नेटकऱ्यांचा सवाल, 'ही परवानगी कुणी दिली?'

SCROLL FOR NEXT