परभणी गर्दीचा फोटो 
मराठवाडा

परभणी शहरात विकेण्ड लॉकडाऊनचा सकाळच्या सत्रात फज्जा

शहरातील कोरोना संसर्ग कमी होऊ लागला आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या कमी होऊ लागली असून जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी वेळोवेळी लावलेल्या निर्बंधांची परिणामकारक अंमलबजावणी झाली

सकाळ वृत्तसेवा

परभणी ः जिल्हा प्रशासनाच्या विकेन्ड लॉकडाऊनचा (Parbhani weekend lockdown) शनिवारी (ता. 22) सकाळच्या सत्रात शहरात सर्वत्र हातगाडीवाले, विक्रेते व व्यापाऱ्यांनी फज्जा उडवला. पोलिस रस्त्यावर (Police) उतरल्यानंतर रस्त्यांवरील गर्दी ओसरली परंतु अनेक भागात पोलिसांच्या वाहनांना खिजवण्याचे प्रकार मात्र सर्रास सुरु होते तर काही भागात विक्रेते, त्यांचे नोकर- चाकर आपआपल्या आस्थापनांसमोर ठाण मांडून होते. (in- the morning- session- of the- weekend- lockdown -in Parbhani -city)

शहरातील कोरोना संसर्ग कमी होऊ लागला आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या कमी होऊ लागली असून जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी वेळोवेळी लावलेल्या निर्बंधांची परिणामकारक अंमलबजावणी झाली, तर बेलगाम झालेला कोरोना आटोक्यात येऊ शकतो. गेल्या काही दिवसापासून पोलिस प्रशासनाही हिरीरीने रस्त्यावर उतरल्याचे चित्र असून दिवसात चार- दोन तास का होईना निर्बंधांच्या कडक अंमलबजावणीचे प्रयत्न होत आहेत. महापालिका मात्र काही भागात पोलिसांच्या बळावर आरटीपीसीआर चाचण्या व विनामास्क फिरणाऱ्यांच्या पावत्या फाडण्यातच व्यस्त आहे. जिल्हाधिकारी श्री. मुगळीकर यांनी शुक्रवारी (ता. 21) शनिवार (ता. 22) व रविवार (ता. 23) विकेन्ड लॉकडाऊन जाहिर केला आहे.

हेही वाचा - लॅपटॉपवर परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्क्रीनवर छायाचित्र दिसते. त्यामुळे त्यांची हालचाल त्यात टिपली जाते. तर मोबाईलवर परीक्षा देणाऱ्यांच्या आयपी ऍड्रेसद्वारे त्यांची हालचाल टिपली जात आहे.

लॉकडाईनचा ठिकठिकाणी फज्जा

या विकेन्ड लॉकडाऊनमध्ये आरोग्य सेवा व शेती उद्योगाशी निगडीत सेवा व दुधविक्री वगळता भाजीपाला-फळविक्रीसह किराणी आदी सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे जाहिर केले होते. परंतु शनिवारी पहाटपासूनच गांधी पार्क, क्रांती चौक, जिंतुररोड, वसमत रोड, साने चौक, गव्हाणे चौक, कडबी मंडी, आदी परिसरात मोठ्या प्रमाणात भाजी विक्रेते, हातगाडावाले दाखल झाले होते. खरेदीसाठी आलेल्या नागरीकांची संख्या देखील मोठी होती. शहरातील रस्त्यावर प्रचंड वर्दळ सुरु होती. निर्बंध घातलेली कपडा- लत्ता, किराणा, वाहनदुरुस्ती आदी काही दुकाने कमी जास्त प्रमाणात सुरु होती. शटर बंद परंतु विक्री सुरु अशी परिस्थिती दिसून येत होते. रस्त्यावर पोलिस उतरताच हे विक्रेते रस्त्यावरून अंतर्गत रस्त्यावर पसार झाले. अनेकांनी शटर डाऊन करून दुकानासमोर ठाण मांडले.

पोलिसांना खिजवण्याचे प्रकार

तिनही पोलिस ठाण्याअंतर्गत पोलिस अधिकाऱ्यांची वाहने शहरातील गर्दी कमी करण्यासाठी पेट्रोलींग करीत आहेत. ध्वनीक्षेपकावरुन निर्बंधांची जाणीव करुन देत आहेत. परंतु ही वाहने दिसताच दुकानासमोर ठिय्या मारलेले मालक, नोकर- चाकर गल्लीबोळात पोबारा करीत असून पोलिस वाहन जाताच पुन्हा दुकानासमोर येऊन पोलिसांचा खिल्ली उडवून खिजवण्याचे प्रकार सर्सास सुरु आहे. रेल्वेस्थानक रस्ता, दुनाकासमोर थांबलेल्यांना देखील दंडुक्याच्या प्रसादाची गरज निर्माण झाली आहे.

चाचण्यांच्या जागा बदलाची गरज

शहरात शिवाजी चौक व दर्जारोड येथे निर्बंध मोडणारे, विनाकारण जा- ये करणाऱ्यांच्या कोरोना चाचण्या केल्या जात आहे. आता चाचण्यांच्या जागा बदलणे गरजेचे आहे. ज्या ठिकाणी निर्बंध असतांनाही गर्दी होत आहे, अशा भागात या चाचण्या सक्तीच्या करणे गरजेचे आहे.

शहरात हातगाड्यांवर व्यवसाय करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. सकाळी 11 पर्यंत व्यवसायास मुभा असतांनाही हे विक्रेते रात्री उशिरापर्यंत रस्त्यावर ठिकठिकाणी ठाण मांडीत आहेत. तसेच गल्लोगल्लीत देखील त्यांचा वावर वाढला आहे. काही निर्बंध लागू असलेल्या मुख्य बाजारपेठेतील दुकानदारांनी आपले व्यवसाय सुरु ठेवले आहेत. त्यांना निर्बंधातून अभय दिल्याची चर्चा बाजारपेठेत सुरु आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

U19 Asia Cup: भारतीय संघाची फायनलमध्ये धडक! वैभव सूर्यवंशी - आयुष म्हात्रे फ्लॉप, पण उपकर्णधाराने उपांत्य सामन्यात मिळवून दिला विजय

जे बात! सख्खी बहीण होणार शत्रू पण सासू घेणार धाकट्या सुनेची बाजू; 'लग्नानंतर होईलच प्रेम'मध्ये पुढे काय घडणार?

PMC Election : प्रचारासाठी मैदान, चौक वापरायचा असेल तर पैसे मोजा; पुणे महापालिकेचे निवडणूक शुल्क जाहीर!

Thane Politics: कल्याण–डोंबिवलीत काँग्रेसची ताकद कायम, पोटेंच्या आरोपांना रत्नप्रभा म्हात्रेंचा पलटवार

IND vs SA, 5th T20I: संजू सॅमसनचे पुनरागमन, भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन मोठे बदल; द. आफ्रिकेने जिंकला टॉस

SCROLL FOR NEXT