sp magar.jpg 
मराठवाडा

मराठवाड्यातील पहिल्या निर्जंतुकीकरण कक्षाचे लोकार्पन

कृष्णा जोमेगावकर

नांदेड : कोरोनापासून संरक्षण करणाऱ्या सॅनिटायझर कक्ष तसेच संजीवनी दुत या मोबाईल व्हॅनचे शुक्रवारी (ता. १०) विशेष पोलिस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया व पोलिस अधीक्षक विजयकुमार यांनी लोकार्पण केले. मराठवाड्यातील पहिल्या व महाराष्ट्रातील दुसरे निर्जंतुकीकरण जीवन बिंदू कक्ष ठरले आहे. पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांच्या संकल्पनेतील हा आणखी प्रयोग पोलीस महासंचालकांच्या सुचनेवरुन करण्यात आला.

७२ तासात यंत्रणा उभारण्यात आली
पोलीस अधीक्षक कार्यालयात येणाऱ्या कर्मचारी, तक्रारदार तसेच अतिथींसाठी पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांच्या संकल्पनेतील जीवन बिंदू या सॅनिटायझर कक्षाचे आणि संजीवनी दुत या मोबाईल व्हॅनच्या निर्मितीसाठी केवळ ७२ तासात यंत्रणा उभारण्यात आली. सर्वत्र टाळेबंदी व साधनांची उपलब्धता नसतानाही पोलीस अधीक्षकांनी या दोन संकल्पना शुक्रवारी साकार केल्या. 

रोगाचा संसर्ग टाळण्यासाठी उपयोग
जीवन बिंदू हे नाव ठेवताना त्यांनी मोठा व्यापक विचार केला. जीवनाचे रक्षण करण्यासाठी हा बिंदू उपयोगी पडणार असून सॅनिटायझर कक्षातील फवारणीनंतर येणारे सर्व अतिथी पोलीस अधीक्षक कार्यालयातील विविध विभागात जातील. बाहेरच्या कुठल्याही रोगाचा संसर्ग होऊ नये आणि आपले जीवन सुरक्षित करण्यासाठी हा जीवन बिंदू निश्चितच उपयोगी पडणार आहे. महाराष्ट्राच्या तुलनेत हा मोठा आकार असलेला व एकाचवेळी दोन जणांना प्रवेश देवून सॅनिटायझरचा फवारा करुन स्वतःला सुरक्षित करण्यासाठी ही संकल्पना पूर्णत्वास आल्याचे त्यांनी सांगितले.

संजीवनी दुत मोबाईल व्हॅन तयार
दुसरीकडे शहराच्या मोठ्या लोकसंख्येच्या पाश्र्वभूमीवर कर्मचाऱ्यांचे देखील निर्जंतुकीकरण करण्यासाठी देखील संजीवनी दुत ही मोबाईल व्हॅन तयार करण्यात आली आहे.  सॅनिटायझरचा फवारा करुन एकावेळी किमान तीन जणांना यातून त्याचा उपयोगी घेता येईल. शहरातील विविध भागात संजीवनी दुत व्हॅन फिरणार असून, कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने व त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने ती फलदायी ठरेल. नागरिकांना देखील त्याचा हळूहळू वापर करता येईल, असेही मगर यांनी सांगितले. 

आयजींच्या हस्ते लोकार्पन
शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांच्या हस्ते जीवन बिंदू व संजीवनी दुत या दोन्ही उपक्रमांचे लोकार्पण करण्यात आले. मराठवाड्यातील पहिल्या व महाराष्ट्रातील दुसऱ्या या सॅनिटायझर फवारा करण्याच्या उपक्रमांची सुरुवात करण्याचा मान नांदेडला मिळाल्याचा आनंद जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी बोलून दाखविला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड, उड्डाणावेळी...; गुजरात दौऱ्यात काय घडलं?

Nashik Land Scam: 'टंकलेखनातील चूक' सांगत ९८ हजार चौ.मी. जमीन गायब? पीटीसीसमोरील ६२ एकर जमीन प्रकरणात जिल्हा प्रशासनाचा खंडपीठात अहवाल

Latest Marathi News Update : दिशा सालियान प्रकरणी संजय राऊतांचा मोठा दावा, भाजपवर थेट इशारा

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात गणेशोत्सवातील देखाव्यातून विरोध; राजू शेट्टी, सतेज पाटील, जयंत पाटलांना भावनिक साद

Devendra Fadnavis: पिके करपली, दुष्काळाचे संकट गडद; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले एनडीआरएफची वाट पाहणार नाही, आधीच शेतकऱ्यांना मदत देणार

SCROLL FOR NEXT