परभणी ः परभणीचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या कार्यतत्परेतेचे एक उत्तम उदाहरण ता. 29 मार्च रोजी पहावायस मिळाले. एका गरीब रुग्णांच्या सिटीस्कॅनसाठी जादा पैसे आकारणाऱ्या खासगी डॉक्टरची जिल्हाधिकाऱ्यांकडून कानउघडणी करण्यात आली. एका सर्वसामान्य नागरीकांचा फोन उचलून त्याला तातडीने मदत करण्याऱ्या जिल्हाधिकारी दीपक मुगळीकरांचे परभणी शहरातून कौतूक केले जात आहे.
परभणी येथील इलेक्ट्रशियनचे काम करून स्वताचा व कुटूंबाचा उदरनिर्वाह चालविणारे नारायण रेवणवार यांच्या वडीलांसह भावाला कोरोनाची लागण झाली आहे. सध्या ते दोघेही आयटीआय येथील कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. वडीलांचे सिटीस्कॅन करण्यासाठी नारायण रेवणवार हे परभणी शहराती एका नामवंत डायग्नोस्टीक सेंटरमध्ये गेले होते. त्या ठिकाणी त्यांना सिटीस्कॅनची फीस 5 हजार रुपये आकारण्यात आली. परंतू श्री. रेवणवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी तीन हजार रुपये घेण्याचे आदेश दिलेले आहेत अशी कल्पना संबंधीत डॉक्टरांना दिली. पंरतू डॉक्टरांनी मला तशे लेखी आदेश नाहीत त्यामुळे मी फिस कमी करू शकत नाही असे उत्तर श्री.रेवणवार यांना दिले.
आर्थिक अडचणीत असलेल्या नारायण रेवणवार यांनी तातडीने ही बाब जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांना फोनव्दारे कळविली. जिल्हाधिकाऱ्यांनीही याची गंभीर दखल घेत संबधीत डॉक्टरांची फोनवरून कानउघडणी केली. सर्वसामान्यांना त्रास देवू नका असे सांगत तातडीने त्यांचा सिटीस्कॅन अहवाल रेवणवार यांना द्यावा असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यानंतर श्री. रेवणवार यांना त्यांच्या वडीलांच्या सिटीस्कॅनचा अहवाल तीन हजार रुपये घेवून देण्यात आला.
जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी कोरोना काळात कुणीही खासगी डॉक्टरांनी सर्वसामान्य नागरीकांना त्रास होईल असे वागू नये. शासनाने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणेच फिस आकारणी करावी असे आदेश दिलेलेआहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेली तातडीची दखल जिल्ह्यात मात्र चर्चेचा विषय ठरली आहे. त्याचे सर्वत्र कौतूक होत आहे.
संपादन- प्रल्हाद कांबळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.