Kolhapur style dam sakal
मराठवाडा

Jintur News : कोल्हापुरी पद्धतीचे बंधार्‍याची कामे झाल्याने सिंचनामध्ये वाढ; मात्र काही बंधाऱ्यांना गेट नसल्याने पाणी वाहून गेले

गेट बसवलेल्या बंधाऱ्यांमध्ये पाणीसाठा झाल्याने उन्हाळ्यात परिसरातील शेती सिंचनाची सोय झाली. परंतु गेट नसलेल्या बंधाऱ्यातील पाणी गेले वाहून.

राजाभाऊ नगरकर

जिंतूर - गेट बसवलेल्या बंधाऱ्यांमध्ये पाणीसाठा झाल्याने उन्हाळ्यात परिसरातील शेती सिंचनाची सोय झाली. परंतु गेट नसलेल्या बंधाऱ्यातील पाणी वाहून गेले. शेती सिंचनाच्या मुख्य उद्देशाने ओढा, नाला इत्यादी लहान जलप्रवाहांमध्ये अधिक पाणी अडविण्यासाठी कोल्हापूरी बंधारे बांधले जातात.

जिंतूर तालुक्यात डोंगराळ भाग असल्याने ग्रामीण भागातील सिंचनाची, पाणी टंचाईची समस्या लक्षात घेता आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ (छत्रपती संभाजीनगर) विभागामार्फत आणि मृद व जलसंधारण विभाग परभणी या यंत्रणेद्वारे माथला येथे दोन, केहाळ येथे तीन, धमधम येथे दोन, पाचलेगाव, करंजी, पुंगळा, येनोली, चामणी, अकोली शिवारात प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण १३ कोल्हापुरी पद्धतीचे बंधार्‍यांची कामे मंजूर करण्यात आली.

पैकी बहुतेक बंधार्‍यांमध्ये पाणी आडविल्यामुळे यावर्षीच्या पावसाळ्यात आणि या आठवड्यातील बिगरमोसमी पावसामुळे पाणीपातळीत बऱ्यापैकी वाढ होऊन लगतच्या विहिरीमध्ये देखील पाण्याची वाढ झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे उन्हाळ्यामध्ये परिसरातील जनावरासाठी व शेतीसिंचनाची सोय उपलब्ध झाल्याने आजूबाजूंच्या शेतकऱ्यांना याचा लाभ होणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे.

असे असले यातील काही बंधाऱ्यांसह वेगवेगळ्या विभागामार्फत बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यांना अद्यापही गेट बसवले नाही,परिणामी पावसाळ्यातील पाणी वाहून जाते. त्यामुळे बंधारे निर्मितीचा उद्देश साध्य होत नसल्याने शासनाचा कोट्यावधीचा वाया जातो. याकडेही लोकप्रतिनिधी व संबंधित विभागाने लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IndiGo Flights Cancelled : सरकारचा ‘इंडिगो’ला आणखी एक मोठा दणका! तब्बल ७०० हून अधिक उड्डाणे केली आहेत कमी

IND vs NZ: सूर्यकुमार भारताला मॅच जिंकवून आला अन् थेट 'त्या' खास व्यक्तीच्या पायाच पडला; Photo Viral

Pali Leopard : सुधागडमध्ये बिबट्याशी आमनासामना! म्हशी शोधायला गेलेला शेतकरी थोडक्यात बचावला?

Bigg Boss Marathi 6 Video : भाऊच्या धक्क्यावर विशाल-अनुश्रीला चांगलंच झापलं; "Women Card वापरून तुम्ही.."

Latest Marathi news Live Update : हैदराबादच्या नामपल्लीमध्ये आग लागली

SCROLL FOR NEXT