File photo 
मराठवाडा

‘हा’ विभाग ठरला विश्‍वासास पात्र : कोणता ते वाचाच

प्रल्हाद कांबळे

नांदेड :  शासनाच्या विविध योजना राबविण्यासाठी टपाल कार्यालय अग्रेसर ठरल्याचे एकंदरितच आकडेवारी आणि सर्वसामान्यांना मिळालेल्या विविध योजनेच्या लाभावरून दिसून येते. टपाल खात्यामार्फत जवळपास जिल्ह्यातील दहा लाख नागरिकांना विविध योजनेतून लाभ देण्यात आला आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत ७५ हजार २०० खाते उघडण्यात आले आहेत. नांदेडची पोस्ट पेमेंट बँक ही मराठवाड्यात ग्राहकांच्या विश्‍वासाला उतरल्यामुळे तिने अव्वल स्थान प्राप्त केले आहे.

पत्रव्यवहारासाठीच होती पूर्वी ओळख
शहरी व ग्रामीण जनतेसाठी टपाल जीवन विमा, प्रधान मंत्री सुरक्षा विमा, प्रधानमंत्री जीवन ज्योती, बचत खाते, जननी सुरक्षा, किसान सन्मान, गॅस अनुदान, संजय गांधी, सुकन्या समृद्धी, आधार दुरुस्ती व अद्यावतीकरण आणि टपाल कार्यलयामार्फत केंद्र व राज्य शासनाच्या ज्या काही सर्वसामान्यांसाठी सुरू केलेल्या विविध योजनांची अंमलबजावणी करते. टपाल विभागाची पूर्वी फक्त पत्रव्यवहारासाठीची ओळख होती. सुरवातीच्या काळात तार, त्यानंतर पोस्ट कार्ड, आंतर्देशी पत्र, मनी आॅर्डर यासह आदी सुविधा नागरिकांना अतिशय वेळेत व विश्‍वासाने पुरविल्या जात होत्या.  

आजही विश्‍वास टपाल विभागावरच
बदलत्या काळातही नागरिकांचा विश्‍वास टपाल विभागावरच आहे. सायकलवर येणारा पोस्टमन आजही अनेकांना आठवतो. परंतु, सध्या जग इतक्या झपाट्याने पुढे जात असल्याने त्याबरोबर आपणही मागे राहता कामा नये; म्हणून टपाल विभागाने आपल्या एका छताखाली सर्व व्यवहार सुरू केले आहेत. पार पत्रापासून ते बँकेपर्यत सर्व काही एकाच ठिकाणी सेवा मिळत आहे. जीवन विमा असो, की शासनाची एखादी योजना, यातून नागरिकांची सेवा करण्याची संधी या टपाल विभागात कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांना मिळत आहे.  

पोस्ट कार्यालयातील सुविधा

  • कोणत्याही कागदपत्राशिवाय दोन मिनिटांत बँक खाते सुरू.
  • खात्यामध्ये किमान शिलकीची मर्यादा नाही.
  • प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, जननी सुरक्षा योजना, किसान सन्मान योजना, गॅस सबसिडी, संजय गांधी पेन्शन आणि राज्य तसेच केंद्र सरकारच्या सर्व योजनांचा लाभ.
  • तसेच एनईएफटी, आयएमपीएस, आरटीजीएस, यूपीआय व इतर फंड ट्रान्सफरची सुविधा.०- मोबाईल अॅप
  • पैसे जमा करणे, काढणे, व इतर बँकिंग सुविधा सर्व टपाल कार्यालयात उपलब्ध.
  • शाळा, महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप अकाउंट म्हणून उपयुक्त.
  • चेक जमा करणे, लाईट बिल, मोबाईल रीचार्ज. डीडीएच रीचार्ज सेवा उपलब्ध.
  • टर्म इन्शुरन्स, एंडोमेन्ट इन्शुरन्स आदी विमा सुविधा उपलब्ध.

विविध योजना व लाभधारकांची आकडेवारी

  1. सुकन्या समृद्धी योजना - ४७ हजार खाते
  2. टपाल जीवन विमा आणि ग्रामीण टपाल जीवन योजना - ६२ हजार विमाधारक.
  3. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना - ५२ हजार ९३५ खातेदार.
  4. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना - दोन हजार ५८६ खाते.
  5. आधार कार्ड दुरुस्ती व अद्यावतीकरण - २३ हजार ५७६ ग्राहकांना लाभ.
  6. इंडिया पेमेंट बँक - ७५ हजार २०० खातेदार.

 एकाच छताखाली सर्व सुविधा
जिल्ह्यातील सर्वसामान्यांना एकाच छताखाली सर्व शासकीय योजना डाक विभागाकडून पुरविल्या जात आहेत. विश्‍वासार्हता जपत डाक विभाग मराठवाडा विभागात अव्वल ठरले आहे. जिल्ह्यातील सर्व सहकाऱ्यांच्या बळावर आम्ही काम करत आहोत. खाते उघडण्यासाठी आधार कार्ड क्रमांक, पॅन कार्ड क्रमांक (असल्यास), मोबाईल नंबर आणि १०० रुपये एवढेच लागते.
- शिवशंकर लिंगायत, डाक अधीक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explainer: फडणवीस आणि शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; पण राज ठाकरेंसाठी 'मवाळ भूमिका', नेमकं समीकरण काय? वाचा सोप्या शब्दात

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

SBI Bank Manager Viral Video : ''तुला iPhone देईन, शारीरिक संबंध ठेव..’’ म्हणत, महिला कर्मचारीशी घृणास्पद कृत्य करणाऱ्या SBI व्यवस्थापकाचा भांडोफोड!

Yavatmal News: लाखो विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास! शिक्षणासाठी खेड्यातून ‘अप-डाऊन’, सवलतीच्या पासचा दिलासा पण...

Pune Crime : ४० दिवसांच्या मुलीची साडेतीन लाखांत विक्री; आई-वडिलांसह सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT