file photo 
मराठवाडा

उपोषणाचा इशारा देताच ग्रामसेवकाकडून माहिती; कळमनुरी पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती यांनी दिला होता इशारा

संजय कापसे

कळमनुरी (जिल्हा हिंगोली)  : पंचायत समिती अंतर्गत अधिकारी व ग्रामसेवकाकडून कामाची माहिती उपलब्ध करून दिली जात नसल्याच्या कारणावरून पदाधिकाऱ्यांनी उपोषणाचा इशारा देताच हादरलेल्या अधिकाऱ्यांनी संबंधितांची मनधरणी करून येत्या आठ दिवसात सर्व माहिती उपलब्ध करून देण्याचे लेखी पत्र देत हा विषय तात्पुरता निकाली काढला आहे.

येथील पंचायत समिती सभापती व उपसभापती कडून पंचायत समिती अंतर्गत स्वच्छ भारत मिशन स्वच्छतागृह बांधकामावर झालेल्या खर्चाचा तपशील दलित वस्ती व चौदाव्या वित्त आयोग अंतर्गत झालेल्या कामाची चौकशी करून खर्च झालेल्या निधीचा अहवाल मागण्यात आला होता मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी या कामाची माहिती देण्यास टाळाटाळ केली. या कामांमध्ये झालेला गैरव्यवहार दडपण्याचा प्रयत्न संबंधित अधिकारी वर्गाकडून केला जात असल्याचा आरोप सभापती पंचफुला बेले व उपसभापती मंजूषा राजेगोरे यांनी करून या प्रकारा विरोधात कळमनुरी पंचायत समिती कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. पंचायत समिती पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तातडीने मध्यस्थांमार्फत पदाधिकाऱ्यांची मनधरणी करीत आंदोलन मागे घेण्याची विनंती लावून धरली होती.

पदाधिकाऱ्यांनी या प्रकरणात पंचायत समिती अंतर्गत केलेल्या कामाची माहिती व चौकशी करण्यासंदर्भात लेखी पत्र देण्याची मागणी अधिकाऱ्यांनी मान्य केली अधिकाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांच्या मागणी प्रमाणे करण्यात आलेल्या बांधकामाचा निधी वापर केलेला खर्च व काही प्रकरणात चौकशी करण्याचे लेखी पत्र  दिल्यानंतर पदाधिकाऱ्यांनी आपले आंदोलन तूर्त स्थगित केले. पंचायत समिती प्रशासनाकडून पदाधिकाऱ्यांनी मागणी केलेल्या कामाची चौकशी व  निधी वापराबाबत आता काय माहिती दिली जाते याकडे लक्ष लागले आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: ५८ व्हिडिओनंतर नवा धक्का... कॅप्टन खरात प्रकरणात SIT ची स्थापना, मध्यरात्री फार्महाऊसमध्ये काय सापडलं?

Success Story: जिद्द, परिश्रमाच्या जोरावर उभारली उत्तुंग यशाची गुढी; कोमल ढवळे यांची सहाय्यक राज्य कर आयुक्त पदावर झेप!

जॉस बटलर निवृत्ती घेणार? T20 World Cup मधील खराब कामगिरीवर अखेर सोडलं मौन; म्हणाला, 'जसं असेल, तसं...'

धुरंधर २ रिलीज होताच दिग्दर्शकाला मागावी लागली माफी, म्हणाले...'आम्ही रात्रभर प्रयत्न करुनही...'

Gold Rate Today: गुढीपाडव्याच्या शुभमूहर्तावर सोन्याच्या भावात मोठी घसरण! सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा; पाहा आजचा ताजा भाव

SCROLL FOR NEXT