फोटो 
मराठवाडा

पर्यावरणाच्या सहवासात जैवविविधतेचा अभ्यास ‘या’ शाळेचा पुढाकार

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : लोहा तालुक्यातील डेरला येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी ता. २० फेब्रुवारी रोजी जवळच असलेल्या रत्नेश्वरी माळाच्या पायथ्याशी एक दिवस परिसर सहल काढून पर्यावरणाच्या सानिध्यात केला जैवविविधतेचा अभ्यास.

परिसरातील सजीवामधील विविधता शिक्षक दत्तात्रय पांचाळ, दीपाली सनपूरकर, अंजली भंडे, ज्योती हंबर्डे, पद्‌मीनबाई धुमाळे व प्रगतशील शेतकरी दाजीबा पाटील कदम, रामा डाकोरे, शिवशंकर कदम, पापन कदम, ज्ञानेश्वर कदम यांच्या मदतीने विद्यार्थ्यांनी जाणून घेतली दैनिक परिपाठानंतर शाळेपासून नियोजित स्थळापर्यंत कोणकोणत्या बाबींचे सूक्ष्मनिरीक्षण करून टीपण करावयाचे हे प्रारंभी सांगण्यात आले. 

जंगलात काय- काय पहावयास मिळते

त्यानुसार विद्यार्थ्यांनी प्राणी, पक्षी, कीटक, वनस्पती आदींच्या सानिध्यात मुक्त भटकंती करून निसर्गाची विविधांगी रूपे मुलांनी पाहिली. शेतात राबणारी माणसे, वाटेत लागणारी स्मशानभूमी, मृत प्राण्यांची हाडे, अवतीभवतीची झाडेझुडपे, पीकपाणी, मातीचे विविध प्रकार, त्यात काळी, पांढरी, लाल, चुनखडी, खडकाळ माती पाहात ओढा, कॅनल, बंधाऱ्यावरून पाणी त्यातील जीवजंतू पाहून प्राण्यांत गाय, बैल, म्हैस, शेळ्या, कुत्रा, मांजर, पक्ष्यांत औताच्या मागे आपलं भक्ष मिळविणारे बगळे, आखाड्यावरील कोंबड्या, झाडीतला मोर, कावळा, चिमणी, साळुंकी, कोतवाल, तांबट खंड्या, पोपट, भारद्वाज, टिटवी हे पक्षी.

निसर्गातील नाविण्य न्याहाळले

रंगीबेरंगी फुलांवरून उडणारी फुलपाखरे, गवतावरून उडणारा नाकतोड्या, दगडाखालचा विंचू, कोळी, गोम, खेकडा, खारूताई, मुंग्याचे वारूळ, सापाची कात, सरडा, बेडूक, मुंगूस, वाळवी, मधमाशाचे पोळे यांच्यासह वड, पिंपळ, चिंच, आंबा, बोरी, बाभळी, पळस, चिलाटी, केतकरी, मोह, पिकामध्ये ऊस, हळद, एरंडा, गहू, हरभरा, रानभाज्यांसह शेतातल्या भाज्या, विविध वनस्पतींची पाने, फुले, फळे, निसर्गसृष्टीची नाविन्यता न्याहाळीत मानवाने उत्खनन केलेला माळ यावर चर्चा करत एकदिवसाच्या मुक्तशाळेत माळाच्या पायथ्याशी, मळ्यात बालसभा भरवून ऐंशी वर्षे वयाचा शेतकरी दाजीबा कदम यांची सातवीतील विद्यार्थिनी शिवानी शिवशंकर कदम हिने मुलाखत घेतली. वनभोजनाचा आस्वाद घेऊन जैवविविधता डोळ्यांत भरून चिमुकले आनंदाने घराकडे परतले.
--

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुणे पोलिसांकडून अधिकाराचा गैरवापर, स्वत:ची चूक झाकण्यासाठी निरपराधाला खोट्या गुन्ह्यात अडकवलं; हायकोर्टानं फटकारलं

कराड तालुका हादरला! चाकूच्या धाकाने युवतीवर अत्याचार;संशयिताकडून आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरलची धमकी, चौघांवर गुन्हा..

Latest Marathi news Update : BCCIचे माजी अध्यक्ष इंद्रजीत सिंह बिंद्रा यांचं निधन

Padma Awards 2026 : पद्म पुरस्कार जाहीर: महिलांचा सन्मान, परदेशी नागरिकांचा गौरव; धर्मेंद्र, अच्युतानंदन यांना पद्मविभूषण

Republic Day 2026 : देशातील ४१ गावं स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच साजरा करणार प्रजासत्ताक दिन, कारणही आहे खास

SCROLL FOR NEXT