inspiring story of namrta chate mpsc exam savitribai phule jayanti Sakal
मराठवाडा

Inspiring Story : कामातून उमटविला सावित्रीच्या लेकीने ठसा; उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे यांची यशोगाथा

उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे यांची यशोगाथा; विविध ठिकाणी बजावली सेवा

प्रवीण फुटके

परळी वैजनाथ : येथील मुख्य प्रशासकीय विभागातील कर्तव्यदक्ष उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे या सावित्रीचा वारसा जपत असून, उपविभागीय अधिकारी म्हणून कार्य करताना जिल्ह्याचा जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या परळी- नगर रेल्वेचे भूसंपादन गेल्या अनेक वर्षांपासून रखडले होते, ते या परिसरात तीन वर्षांत त्यांनी पूर्ण केले आहे.

येथील उपविभागीय अधिकारी नम्रता देविदासराव चाटे २०१२ मध्ये लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत राज्यात मुलींमध्ये प्रथम आल्या. उपजिल्हाधिकारी म्हणून त्यांची निवड झाली होती. मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या त्यांना एक भाऊ आणि एक बहीण आहे.

दोघेही उच्च न्यायालयात वकील आहेत. तर, वडील कार्यकारी अभियंता म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. नम्रता चाटे यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण अंबाजोगाई येथील योगेश्वरी विद्यालयात झाले. महाविद्यालयीन शिक्षण अंबाजोगाई आणि छत्रपती संभाजीनगर येथे पूर्ण केले.

नंतरचे पुढील शिक्षणही संभाजीनगरमध्येच झाले. विद्यापीठातून पत्रकारितेतील पदवी घेतली. तर, चौथ्या प्रयत्नात उपविभागीय अधिकारी म्हणून निवड झाली. या अगोदर विक्रीकर निरीक्षक म्हणून ही निवड झाली होती, प्रशिक्षणार्थी म्हणून नागपूरला सावनेर येथे उपविभागीय अधिकारी,

नंतर बुलडाणा, सिंदखेड राजा येथे उपविभागीय अधिकारी, नंतर बीड जिल्ह्यात पाटोदा आणि परळी येथे उपविभागीय अधिकारी म्हणून काम पाहिले. यामध्ये पाटोद्याला असताना २०१९ मध्ये दुष्काळ पडला होता.

यावेळी दुष्काळ निवारणासाठी मोठ्या उपाययोजना केल्या. तर, परळीत आल्यानंतर जिल्ह्याचा जिव्हाळ्याचा विषय असलेला परळी- नगर रेल्वे मार्गाचे गेल्या २० वर्षांपासून काम सुरू आहे. यात परळी तालुक्यात भूसंपादन रखडले होते, येथे नियुक्ती होताच त्यांनी ते पूर्ण केले.

तसेच शासनाचा अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या नियोजनात मोठी भूमिका बजावत कार्यक्रम यशस्वी केला. प्रशासन सामान्य माणसाच्या कामी यावे, यासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेली सावित्रीची लेक म्हणून अभिमान असल्याचे उपविभागीय अधिकारी चाटे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरण! संशयित आरोपी मनीषा मुसळे माने यांचा दोषमुक्त करण्याचा न्यायालयाकडे अर्ज, अर्जात नेमके काय? वाचा...

Thane Traffic: घोडबंदर मार्ग 6 तास पाण्याखाली, चालकांचा वाहतूक कोंडीसोबत सामना; ठाणेकरांचे हाल

Uruli Kanchan Crime : विनयभंग करत महिलेला जातिवाचक शिवीगाळ; खासगी सावकारावर गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Updates: मुंबईत बेस्ट बसने दोघांना चिरडले, घटनेने खळबळ

Mumbai News: मुंबईत घर घेणं महागलं! नागरिकांच्या खिशाला फटका, 'इतक्या' टक्क्यांनी किमतीत वाढ, अहवाल समोर

SCROLL FOR NEXT