- आनंद अंकुलगे
जवळगा : सुखी संसार आनंदाने सुरू असताना नियतीने पती हिरावला. त्यातच पुढे दिराचेही निधन झाले. सासरे, सासू, जाऊ, मुले, पुतणे अशा भरलेल्या घरावर दुःखाचा जणू डोंगरच कोसळला. पण या साऱ्यांत त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या, कुटुंबाचा आधार बनल्या. शिक्षिका मायादेवी संतोष बिरादार यांची ही संघर्षमय कथा.
देवणी तालुक्यातील जवळगा येथील मायादेवी यांचा विवाह वर्ष २००५ मध्ये संतोष बिरादार यांच्यासोबत झाला. संतोष गावातील मीरा विद्यालयात मुख्याध्यापक पदावर कार्यरत होते. एक मुलगा तसेच मुलगी अशी संसारवेलीवर फुलेही बहरली. मात्र एक दिवस संतोष यांचे २०१८ मध्ये अपघाती निधन झाले.
मायादेवी यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. तेव्हा सासरे बाबूराव व सासूबाई कमलाबाई यांनी त्यांना धीर दिला. यातून सावरत मायादेवी यांनी पतीच्या जागेवर शिक्षिका म्हणून रुजू झाल्या. मात्र गतवर्षी हृदयविकाराने त्यांच्या दीर गिरिधरचेही निधन झाले.
त्यानंतर मात्र खंबीरपणे घरातील विविध जबाबदाऱ्या मायादेवी यांनी सक्षमपणे पार पाडण्यास सुरवात केली. त्यांना सासर व माहेरच्या दोन्ही कुटुंबाकडून मोलाची साथही मिळाली. शिक्षिका म्हणून नोकरी करण्यासोबत त्यांनी घराकडे, शेतीकडेही लक्ष घातले. नोकरी आणि घर सक्षमपणे सांभाळत आहेत. घरातील ज्येष्ठांचे मार्गदर्शनही त्या घेतात. कुटुंबीयांच्या साथीने त्यांनी समाजासमोर आदर्श ठेवला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.