District Office nanded.jpg 
मराठवाडा

तयार जेवणाएवजी राशन साहित्याचे किट द्यावे

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी सध्या लॉकडाऊन लागू आहे. अशा काळात अन्नदात्यांनी शिजवलेले अन्न देण्याएवजी एका कुंटूबाला एक महिना पुरेल एवढे राशन साहित्याचे किट देण्याचे आवाहन केले आहे. यातून गरजू लोकांची गूजरान होइल, यासाठी शहरात सहा ठिकाणी संकलण केंद्र सुरु केल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी दिली.

तयार जेवणाएवजी धान्य द्यावे
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ता. २४ मार्च पासून लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यात रोजंदारीवर काम करणारे मजूर तसेच परिस्थिती अभावी राशन खरेदी करु शकत नसणारे लोक ज्यांच्याकडे राहते घर व स्वंयपाक करण्याची व्यवस्था आहे, अशा लोकांना शिजवलेले अन्न देण्यापेक्षा एक महिन्याचे कोरडे राशन दिल्यास लॉकडाऊन कालावधीत त्यांना वारंवार अन्न देण्याची गरज पडणार नाही.

महिनाभरासाठी राशन द्यावे
सध्या नांदेड शहरात अनेक ठिकाणी स्वंयसेवी संस्था त्यांच्या पद्धतीने शिजवलेले अन्न देत आहेत. ज्यांच्याकडे स्वंयपाक करण्याची व्यवस्था नाही, अशा बेघर लोकांना सद्याची तयार जेवन देण्याची कार्यपद्धती तशीच सुरु ठेवावी. तथापी रोजंदारीवर काम करणारे गरजू लोक ज्यांच्याकडे स्वंयपाक करण्याची व्यवस्था आहे, अशा लोकांना आवश्यकतेनुसार राशन सहित्याचे किट प्रती व्यक्ती प्रती कुंटूब महिनाभरासाठी तयार करुन दिल्यास स्वंयसेवी संस्थावरील ताणही कमी होइल. 
सहा ठिकाणी संकलण केंद्र

सहा ठिकाणी संकलन केंद्र सुरु
नांदेड शहरात त्याअनुषंगाने सहा ठिकाणी संकलन केंद्र सुरु केले आहेत. या ठिकाणी राशन किट देण्याचे आवाहन केले आहे. यात नरवाडे मंगल कार्यालय, रिलायन्स पेट्रोलपंप, तरोडा नाका, पाटीदार मंगलकार्यालय, दत्तनगर, साहिबजादा बाबा फतेहसिंघजी मंगल कार्यालय, अबचलनगर आणि आर्यवैश्य मंगल कार्यालय, सिडको या ठिकाणी संकलण केंद्र सुरु केले आहे. या ठिकाणच्या संकलन प्रमुखांशी संपर्क करुन धान्याचे किट द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी केले आहे.

राशन किटमधील धान्य
किटमध्ये गहू पंधरा किलो, तांदुळ दहा किलो, तेल एक किलो, डाळ एक किलो, मिठ एक किलो व मिरची पुढ अर्धा किलो असे अंदाजे धान्य किट असावे असे आवाहन केले आहे. तसेच मिनी किटमध्ये तीन किलो गहू, दोन किलो तांदुळ, दोनशे ग्राम तेल, डाळ दोनशे ग्राम, मीट दोनशे ग्राम व मिरची शंभर ग्राम असावा असा कयास आहे.

   
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: बिपिन बाफना खून प्रकरणी आरोपींना ३० वर्षांचा कारावास, हायकोर्टाकडून फाशीची शिक्षा रूपांतरित

डायबिटीज पेशंट्ससाठी Good News! आता आठवड्यातून फक्त एकदाच घ्यावं लागणार इन्सुलिन इंजेक्शन; भारतात आलं नवं इन्सुलिन

Latest Marathi News Live Update : ऑस्ट्रेलियाचा दौरा आटोपून पंतप्रधान मोदी न्यूझीलंडकडे रवाना

Pune Metro Record Ridership : आषाढी वारीत पुणे मेट्रोचा नवा विक्रम; एकाच दिवशी तब्बल ३.५२ लाख प्रवाशांनी केला प्रवास

Mumbai–Pune Trains: मुंबई-पुणे मार्गावरील अनेक रेल्वे गाड्या रद्द; मात्र 'या' दोन एक्स्प्रेस सुरू, पुणे रेल्वे स्थानकाकडून माहिती

SCROLL FOR NEXT