Jayakwadi Dam sakal
मराठवाडा

Jayakwadi Dam : जायकवाडी धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शिक्षणाच्या सुविधा

Jayakwadi Dam : जायकवाडी धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शिक्षणाची सुविधा मिळाली आहे. एक नामांकित बियाणे कंपनीच्या सामाजिक दायित्वाच्या माध्यमातून ढाकेफळ येथील शाळेत डिजिटल स्मार्ट बोर्ड आणि साऊंड सिस्टीम प्रदान करण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

ज्ञानेश्वर बोरूडे

लोहगाव : छञपती संभाजीनगर जिल्ह्यातील जायकवाडी प्रकल्पाने विस्थापित झालेल्या पैठण तालुक्यातील ढाकेफळ येथील धरणग्रस्त जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सामाजिक दायित्वाअर्तगत, एका नामांकित बियाणे कंपनीने आधुनिक पद्धतीचे डिजीटल स्मार्ट इंटर अॅक्टीव्ह बोर्ड, डिजीटल साऊंड सिस्टीम, आदी शैक्षणिक साहित्य भेट दिल्याने धरणग्रस्तांचे पाल्यांना आधूनिक तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण सुविधा उपलब्ध झाली आहे.

लोहगाव (ता.पैठण) परिसरातील मुलांनी वाडगाव, येथे बी. बियाणे, क्षेञात कार्यरत असलेल्या सिझेंटा सिडस कंपनीने आपल्या सामाजिक दायित्वातर्गत आतापर्यंत खामजळगाव,मुलानी वाडगाव,आदी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला पायाभूत सुविधा साहित्याची मदतीचा हातभार लावला असताना पाच दिवसांपूर्वी जायकवाडी प्रकल्पाने पुर्नवसित झालेले ढाकेफळ जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आधूनिक पध्दतीच्या शैक्षणिक साहित्यद्वारे शिक्षण घेण्याची प्रणाली उपलब्ध करून दिली आहे.

यात डिजीटल स्मार्ट इंटर अॅक्टीव्ह बोर्ड, डिजीटल साऊंड सिस्टीम, आणि दोन हजार लिटर पाणी क्षमता साठवण प्लास्टिक टाकी,आदी सा‍हित्याचे पैठण बाजार समिती माजी सभापती रवींद्र शिसोदे, सरपंच भिमराव मोरे, बप्पासाहेब शेळके, ग्रामपंचायत सदस्य काकासाहेब रणशूर,हारिभाऊ कोल्हे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष बिलाल शेख, उपाध्यक्ष अंकुश फुलकर,सिझेंटाचे व्यवस्थापक प्रवीण इंगोले, अभय दुधेकर, रमेश आव्हाड, अशोक पाबळे अशोक पाबळे, यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व डिजीटल साहित्याचे लोकार्पण झाले. यावेळी मुख्याध्यापिका सिंधू घुले, शिक्षक संभाजी शिंदे,कैलास ढोले,नबाब सय्यद, शिक्षिका श्रीमती पाटील, कुलकर्णी,नेहा शिसोदे,पालक विद्यार्थी उपस्थित होते.

प्रतिक्रिया

आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना सामाजिक दायित्वाच्या माध्यमातून सिझेंटा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने डिजीटल शिक्षण साहित्य दिल्यामुळे विद्यार्थी हरकुन गेले आहे.व त्याद्वारे ज्ञान घेत आहेत.

मुख्याध्यापिका : सिंधू घुले जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा ढाकेफळ (ता.पैठण)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT