jalna crime news esakal
मराठवाडा

Jalana : जांब समर्थ मूर्ती चोर ताब्यात

कर्नाटक येथून स्थानिक गुन्हे शाखेने घेतले दोघांना ताब्यात

सकाळ वृत्तसेवा

जालना : जिल्ह्यातील जांब समर्थ (ता. घनसावंगी) येथील ऐतिहासिक राम, लक्ष्मण, सीता मूर्ती चोरणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने कर्नाटक राज्यातून दोघांना ताब्यात घेतले आहे.

घनसावंगी तालुक्यातील जांब समर्थ गावातील रामदास स्वामी यांच्या पूर्वजांनी पंच धातूच्या शेकडो वर्षपूर्वीच्या ऐतिहासिक श्रीराम लक्ष्मण, सीता आशा एकूण नऊ मूर्ती दोन महिन्यांपूर्वी चोरी गेल्या होत्या. ही चोरी उघड करण्याचे पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले होते. हा तपास एसआयटीकडे सोपविण्यात आला होता. शिवाय तामिळनाडू सीआयडीची या तपास कमी मदत घेण्यात आली होती.

मात्र पोलिसांना या प्रकरणात धागेदोरे हाती लागत नव्हते. त्यामुळे पोलिसांनी या चोरी प्रकरणी माहिती देणाऱ्याला दोन लाखांचे बक्षीस ही जाहीर केले होते. अखेर दोन महिन्याच्या कालावधीनंतर या ऐतिहासिक मूर्ती चोरी प्रकरणाचा उलघडा करण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यश आले.

या मूर्ती चोरी प्रकरणातील दोन संशयितांसंदर्भात स्थानिक गुन्हे शाखेला पक्की खबर मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी कर्नाटक राज्यातून या मुर्ती चोरी प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे. दरम्याच्या या चोरट्यांची नावे अद्यापि पोलिसांनी जाहिरात केली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raigad Fort Illegal Hotels : रायगडावर विनापरवानगी हॉटेल, रेस्टॉरंट, कॅफे; रोप -वे कंपनीचे अतिक्रमण, संभाजीराजेंचा घणाघात, "पुरातत्व विभागाकडून पाठबळ"

बिबट्यांना 'जन्मठेप', बालकांचा बळी घेणाऱ्या ४ बिबट्यांबाबत वनविभागाचा मोठा निर्णय

Maharashtra Assembly Winter Session : विधानसभेचे हिवाळी अधिवेशन आजपासून, उपराजधानीत घातपाताची शक्यता; पोलिस यंत्रणा हाय अलर्टवर

Indigo Plane : ‘इंडिगो’चे विमान ‘पार्किंग बे’वरच! रविवारी ५० विमाने रद्द

आजचे राशिभविष्य - 08 डिसेंबर 2025

SCROLL FOR NEXT