orange 
मराठवाडा

जालन्याची मोसंबी जाणार परदेशात! कृषी विभागाच्या पुढाकारामुळे होणार फळांसह भाजीपाल्याची निर्यात

उमेश वाघमारे

जालना : जिल्हा मोसंबी उत्पादनात अग्रेसर आहे. शिवाय जालना तालुक्यातील कवंडची गाव हे द्राक्षांचे गाव म्हणून ओळखले जाते. त्यामुळे जिल्ह्यातील मोसंबी, द्राक्ष, आंबा, डाळिंब, कांद्यासह भाजीपाला इतर देशात निर्यात केली जाणार आहे. यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेतला असून, जूनपासून सुरक्षित अन्न पिकवाची अंमलबाजणी केली जाणार आहे.

जालन्याच्या मोसंबीमध्ये असलेल्या खास गुणधर्मामुळे येथील मोसंबीला मोठी मागणी आहे. त्यामुळे जालना येथील मोसंबीला भौगोलिक मानांकही मिळाला आहे.

याशिवाय जिल्ह्यात द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. तालुक्यातील कडवंची गाव तर द्राक्षाचे गाव म्हणून नावारूपाला आले आहे. द्राक्षासह डाळिंब, आंबा अशी फळपिकेही जिल्ह्यात घेतली जातात. मात्र, ही फळपिके जिल्ह्यासह राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये शेतकरी विक्रीसाठी घेऊन जातात. परंतु, आता केंद्र शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील फळांसह भाजीपाला निर्यात धोरण आत्मसात केले जाणार आहे.

यासाठी जूनपासून सुरक्षित अन्न पिकवाची अमलबाजणी केली जाणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी फळबाग आणि भाजीपाला लागवडीची कृषी अधीक्षक कार्यालयाकडे ट्रेसिबीलीटीद्वारे नोंदणी करणे आहे. या नोंदणी केलेल्या फळबागांना कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून फळ फुलोऱ्यापासून ते काढणीपर्यंत कोणती औषधी फवारणी, कीड प्रतिबंध कसा करावा, फळपिकांची कशी काळजी घ्यावा, या बाबींचे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करणार आहेत. शिवाय भाजीपाला लागवडीपासून ते काढणीपर्यंत शेतकऱ्यांच्या बांधावर कृषी विभागाकडून मार्गदर्शन केले जाणार आहे.

ट्रेसिबीलीटीद्वारे कृषी विभागाकडे नोंदणी केलेल्या फळपीक, भाजीपाल्याची राज्यातील निर्यात करणाऱ्या कंपन्यांना माहिती दिली जाणार आहे. या कंपन्या शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन फळपीक आणि भाजीपाल्याच्या गुणधर्माची तपासणी करून निर्यातीसाठी बाजारभावापेक्षा अधिकची रक्कम देऊन शेतकऱ्यांकडून शेतीमाल खरेदी करणार आहेत.

त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरात चार पैसे अधिकचे पडणार आहेत. शिवाय जिल्ह्यातील मोसंबी, द्राक्ष, डाळिंब, आंबा, कांदा आणि भाजीपाला ही इतर देशात निर्यात होण्यास सुरुवात होणार आहे.

"सुरक्षित अन्न पिकवा या अभियानाअंतर्गत ट्रेसिबीलीटीद्वारे मोसंबी, आंबा, डाळिंब, संत्रा, लिंबू, कांदा, भाजीपाला नोंदणी सुरू केली आहे. नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांना फळ फुलोऱ्यापासून ते काढणीपर्यंत सर्व मार्गदर्शन कृषी विभागाकडून करण्यात येणार आहे. ट्रेसिबीलीद्वारे नोंदणी केलेल्या फळबागांची आणि भाजीपाला क्षेत्राची माहिती इतर देशात फळपिके आणि भाजीपाला निर्यात करणाऱ्या कंपन्यांना दिसणार आहे. या कंपन्यांत शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन फळपिके आणि भाजीपाला बाजार भावापेक्षा अधिक दराने खरेदी करून इतर देशात निर्यात करतील. त्यामुळे शेतकऱ्यांनी ही फळपीक, भाजीपाला निर्यातीसाठी ट्रेसिबिलीटीद्वारे कृषी विभागाकडे नोंदणी करावी."

- जी. आर. कापसे, जिल्हा कृषी अधीक्षक, जालना.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विदर्भात मॉन्सून पुन्हा सक्रीय; 'या' पाच जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट, मुसळधार पावसाची शक्यता

Iran Politics: इराणच्या सत्तेत मोठी खळबळ! खामेनेईंविरोधात घरातूनच बंड? नातलगाने मांडला 'नवीन सरकार'चा आराखडा

Marathi News Live Updates : ‘नागपूर जल ग्राहक सेवा ॲप’ दोन दिवस बंद

NEET paper leak: 'नीट'च्या प्रश्नपत्रिका NTAच्या तज्ज्ञांनीच फोडल्याचा सीबीआयचा निष्कर्ष? 'सप्लाय चेन'बाबत तपासात धक्कादायक माहिती

Nagpur Crime : निर्भयच्या घरात आढळला सुऱ्या, चॉपर, लॅपटॉप अन् गर्भनिरोधकांचा साठा

SCROLL FOR NEXT