लाच८८.jpg 
मराठवाडा

जळकोट : अवैध वाळू वाहतूकीसाठी लाच मागणारा तलाठी जाळ्यात  

शिवशंकर काळे

जळकोट (जि.लातूर) : तालूक्यातील सुल्लाळी येथील तक्रारदार यांचे टँक्टर वाळूसाठी चालू करण्यास सांगून टँक्टरवर कार्यवाही न करण्यासाठी दर महा अठरा हजाराची लाच मागितल्या प्रकरणी तलाठी व त्याच्या साथीदारावर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. दोघांवर जळकोट पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री अकरा वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. 

सुल्लाळी (ता.जळकोट) येथील टँक्टर मालकाकडून घोणसी-माळहिप्परगा-अतनुर सज्जाचे तलाठी ज्ञानोबा हणमंतराव करमले (३३ ) व त्यांचा साथीदार हरीराम अभिमन्यू जानतीने (५५) या दोन्हीही आरोपीने सुल्लाळी (ता.जळकोट) येथील तक्रारदार यांचे टँक्टर वाळूसाठी चालू करण्यास सांगून टँक्टरवर कार्यवाही न करण्यासाठी पंचवीस हजार रुपयाची मागणी केली होती. तडजोडी नंतर अठरा हजार रुपये प्रतिमहीना घेण्याचे मान्य केले होते. तर सदर लाचेची रक्कम तलाठी यांनी साथीदारांकडे देण्याचे सांगितले. 

याबाबत तक्रारदाराने लातूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. तक्रारीची पडताळणी झाल्यानंतर लाचलूचपत पथकाने घोणसी (ता.जळकोट) येथे सापळा लावला. यावेळी तक्रारदार अठरा हजारांची लाच देण्यासाठी गेले. सदर रक्कम घेण्याचे जाणूनबुजून टाळले म्हणून लातूरच्या लाचलुचपत अधिकाऱ्यांच्या पथकाने तलाठी आणि साथीदारावर (ता.सात) रोजी रात्री अकरा वाजता जळकोट पोलिस ठाण्यात कलम सात लाचलूचपत प्रतिबंधक कायदा अधिनियम-१९८८ अन्वये गुन्हा दाखल केला.

यांनी केली कारवाई 

सदरची कार्यवाही एसीबीचे उपअधिक्षक माणिक केंद्रे, पोलिस निरीक्षक दराडे, बाबासाहेब काकडे, पोलिस कॉन्सटेबल संजय पस्तापुरे, लक्ष्मीकांत देशमुख, पोलिस नाईक चंद्रकांत डांगे, मोहन सुरवशे, संतोष गिरी, शिवशंकर कच्छवे, अशिष श्रीसागर, अमोल शिंदे, संदीप जाधव, दिपक कलवले, राजू महाजन यांच्या पथकाने कारवाई केली. 

संपादन-प्रताप अवचार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT